Koynanagar News : कोयना धरणातील पाणी तळाला; जलविद्युत वीजनिर्मिती पूर्णपणे बंद
Koynanagar News : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाणारे कोयना धरण सध्या जलसंकटाच्या अभूतपूर्व चक्रव्यूहात सापडले आहे.

Koynanagar News : संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे कोयना धरणच आज अभूतपूर्व संकटात सापडले आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा तळाला गेल्याने पश्चिमेकडील जलविद्युत वीजनिर्मिती पूर्णपणे बंद झाली आहे. (Koynanagar News)
तर पूर्वेकडील सिंचन व्यवस्थेवर कडक मर्यादा लागू करण्यात आल्या आहेत. दरम्यान, याधरणातील पाणीवाटपाच्या अनुषंगाने सोमवारी जलनीती ठरणार असल्याचे अधीक्षक अभियंता अभय काटकर यांनी सांगितले. (Koynanagar News)
मे अखेरीस उपलब्ध आकडेवारीनुसार धरणात केवळ 10.92 टीएमसी इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. लवादाने निर्धारित केलेला पाणी कोटा 29 मे रोजी संपल्याने पश्चिमेकडील वीज प्रकल्प पूर्णपणे बंद ठेवावे लागले आहेत. (Koynanagar News)
या पार्श्वभूमीवर महानिर्मिती कंपनीकडून वीज प्रकल्प अखंडीत सुरू ठेवण्यासाठी पाणी कोटा वाढवून देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. धरणातील उपलब्ध साठा पाहता या मागणीवर शासनस्तरावर लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा आहे. (Koynanagar News)
कोयना धरणातील शिल्लक पाणीसाठ्याच्या अनुषंगाने पुढील पाणीवाटप कसे करायचे याबाबत शासन येत्या सोमवारी महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. वीज निर्मिती, सिंचन आणि पिण्याचे पाणी या तिन्ही गरजांचा समतोल साधत जलनीती ठरवली जाणार आहे. (Koynanagar News)
सध्याचा पाणीसाठा प्रामुख्याने पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आला असून सिंचन व वीजनिर्मितीसाठी पाणी वापरावर कठोर निर्बंध ठेवणे आवश्यक झाले असल्याचे अधीक्षक अभियंता अभय काटकर यांनी स्पष्ट केले. (Koynanagar News)





