Korea Open badminton : सिंधू उपांत्यपूर्व फेरीत
Updated On:

शिचीयान – भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हीने कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत थाटात प्रवेश केला. तीने गुरुवारी झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत जपानच्या अया ओहोरीवर अवघ्या 26 मिनिटांत 21-15, 21-10 असा विजय मिळवला.
अन्य भारतीय खेळाडूंमध्ये ऑल इंग्लंड स्पर्धेचा उपविजेता लक्ष्य सेन व नवोदित स्टार महिला खेळाडू मालविका बनसोड यांना पराभवाचा सामना करावा लागला. लक्ष्य सेनला शेहेर हीरेन रुस्ताव्हिटो याच्याकडून 22-20, 21-9 असा पराभव पत्करावा लागला. मालविकाला थायलंडच्या पोनापावी चुचुवांगने 21-8, 21-14 असे पराभूत केले.





