Maharashtra Politics : मोठी बातमी..! कोकणात ‘या’ बड्या नेत्याच्या मुलाला उमेदवारी निश्चित; बहिण-भाऊ अर्ज भरण्यासाठी रवाना
विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे.

Maharashtra Politics : विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटल्याचे चित्र दिसत आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्याचे जवळपास निश्चित मानले जात असून, या जागेसाठी युवक नेते अनिकेत तटकरे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यांसह रत्नागिरीकडे रवाना झाले आहेत. (Maharashtra Politics)
रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला कोकणातील पक्षाचे पदाधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. बैठकीनंतर अनिकेत तटकरे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरू केली. विशेष म्हणजे राज्याच्या मंत्री आणि त्यांच्या बहिणी अदिती तटकरे यांच्यासोबत ते एकाच वाहनातून अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाल्याचे पाहायला मिळाले. (Maharashtra Politics)
याआधी अनिकेत तटकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशीही त्यांनी चर्चा केली होती. या भेटींनंतर त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. (Maharashtra Politics)
दरम्यान, या जागेवर दावा करणाऱ्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्या अर्ज मागे घेणार की निवडणूक लढवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)
राजीव साबळेंची नाराजी चर्चेत
कोकणातील या निवडणुकीत आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे राष्ट्रवादीचे प्रवक्ते राजीव साबळे यांची नाराजी. सुतारवाडीतील पक्षाच्या बैठकीला ते आणि त्यांचे समर्थक अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra Politics)
राजीव साबळे हे देखील विधान परिषदेसाठी इच्छुक होते. मात्र पक्षाने त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक भूमिका न घेतल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. बैठकीतील त्यांची अनुपस्थिती ही त्याच नाराजीची झलक मानली जात आहे. (Maharashtra Politics)
महायुतीत राष्ट्रवादीची बाजी
कोकणातील या जागेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र अखेर सुनील तटकरे यांच्या प्रयत्नांमुळे ही जागा राष्ट्रवादीकडे राखण्यात यश आल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आता अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीवर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची औपचारिकता बाकी आहे. (Maharashtra Politics)





