कोंढवा पोलिसांनी पाठलाग करुन पकडला चोरीचा टेम्पो

पुणे : कोंढवा पोलिसांनी चोरीला गेलेला ऍपे प्यागो कंपनीचा माल वाहतून टेम्पो पाठलाग करुन पकडला. याप्रकरणी आरोपीस येवलेवाडी येथे जेरबंद करण्यात आले.
सुरज विलास कुंभार (28, वर्ष रा.येवलेवाडी, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार कोंढवा पोलीस ठाण्यात 50,000 रुपये किंमतीचा अँपे प्यागो कंपनीचा टेम्पो चोरी गेल्याचा गुन्हा दाखल होता. दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेला टेम्पो व आरोपी हा येवलेवाडी भागात असल्याबाबत पोलीस शिपाई किशोर वळे व आदर्श चव्हाण यांना खबर मिळाली होती.
यावरुन तपास पथकातील अंमलदार पोलिस हवालदार संतोष नाईक पोलिस नाईक निलेश वनवे, संजीव कळंबे,पोलिस शिपाई जोतिबा पवार, आदर्श चव्हाण, किशोर वळे यांनी येवलेवाडी भागात सापळा रचून आरोपी सुरज विलास कुंभार यास चोरीस गेलेल्या 50,000,/-रुपये किंमतीच्या टेम्पोसह पळून जात असताना शिताफिने पाठलाग करून पकडून सदरचा गुन्हा उघड केला आहे.
सदरची कामगिरी सुनील फुलारी (अप्पर पोलीस आयुक्त , पूर्व प्रादेशिक विभाग) , सुहास बावचे (उप आयुक्त परिमंडळ 5) ,सुनील कलगुटकर ( सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग), विनायक गायकवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), महादेव कुंभार (पोलीस निरीक्षक) यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाणे तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक चेतन मोरे, पोलिस कर्मचारी संतोष नाईक , निलेश वणवे, संजीव कळंबे, सुशिल धिवार, जोतिबा पवार, किशोर वळे यांच्या पथकाने केली आहे.





