IPL: कोलकाताची विजयी सलामी; धोनीच्या अर्धशतकानंतरही चेन्नईचा पराभव
Updated On:

मुंबई – गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीनंतर सलामीवीर अजिंक्य रहाणेने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या १४व्या हंगामात गतविजेत्या चेन्नई संघावर 6 गडी राखून विजय मिळवला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नई संघाने निर्धारित २० षटकांत ५ बाद १३१ धावा केल्या. यामध्ये धोनीने नाबाद ५० धावा केल्या. त्यात त्याने ७ चौकार आणि एक षटकार लगावला. तर कर्णधार रवींद्र जडेजाने नाबाद २६ धावा केल्या. कोलकाताकडून उमेश यादवने दोन तर वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
प्रत्युत्तर फलंदाजीला आलेल्या कोलकाता संघाने १८.३ षटकांत ४ बाद १३३ धावा करून विजयाची नोंद केली. अजिंक्य रहाणेने ३४ चेंडूत ४४ धावा केल्या. श्रेयस अय्यरने नाबाद २० धावा करून कोलकाता संघाला विजय मिळवून दिला.





