India’s Most Congested City in 2024 | भारतातील काही शहरांमध्ये गर्दीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसत आहे. या वाढत्या गर्दीचा वाहतूक समस्येवर देखील परिणाम होत आहे. शिक्षण आणि नोकरीसाठी शहरात वास्तव्यास जाणाऱ्यांचीही संख्या झपाट्याने वाढत आहे.
भारतातील सर्वात मोठी गर्दी आणि वाहतूक समस्यांमध्ये सहसा दिल्ली-मुंबई किंवा बेंगळुरू शहराचे नाव घेतले जाते. परंतु डच लोकेशन टेक्नॉलॉजीने तज्ज्ञ टॉमटॉमने केलेल्या सर्वेक्षणातून भारतात २०२४ मध्ये सर्वात गर्दीचं शहर कोलकाता ठरलं आहे.
कोलकाता हे 2024 मध्ये भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता हे 2024 मध्ये भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर म्हणून समोर आले आहे. डच लोकेशन टेक्नॉलॉजी स्पेशालिस्ट टॉमटॉमने जारी केलेल्या ट्रॅफिक इंडेक्स अहवालानुसार, कोलकात्यात 10 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी सरासरी 34 मिनिटे आणि 33 सेकंद लागतात. त्याच वेळी, बेंगळुरूमध्ये ही वेळ 34 मिनिटे आणि 10 सेकंद इतकी आहे. मागील वर्षी बंगळुरू हे भारतातील सर्वाधिक गर्दीचं शहर होतं. परंतु, 2024 मध्ये कोलकाताने बंगळुरूला मागे टाकलं आहे. India’s Most Congested City in 2024 |
सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या पहिल्या 10 शहरांची नावं
भारतात कोलकाता, बेंगळुरूनंतर पुण्याचा क्रमांक लागतो. पुण्याचा सरासरी वेग १० किमीसाठी ३३ मिनिटे आहे. पुण्यात 10 किलोमीटरचं अंतर कापायला सरासरी 33 मिनिटं लागतात. तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या हैदराबादमध्ये 10 किलोमीटर अंतर 32 मिनिटांमध्ये कापता येतं.
सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांमध्ये पाचव्या स्थानी चेन्नई (10 किमी अंतरासाठी सरासरी 30 मिनिटांचा वेळ), सहाव्या स्थानी मुंबई (सरासरी 29 मिनिटं), अहमदाबाद (सरासरी 29 मिनिटं) सातव्या स्थानी, एर्नाकुलम (सरासरी 29 मिनिटं) आठव्या, जयपूर (सरासरी 28 मिनिटं) नवव्या आणि नवी दिल्ली (सरासरी 23 मिनिटं) सहीत दहाव्या स्थानी आहे.
जागतिक स्तरावर कोणत्या शहरांचा समावेश ?
विशेष म्हणजे कोलकाता, बेंगळुरू आणि पुणे या तिन्ही शहरांचा समावेश जागतिक गर्दीच्या शहरांमध्येही होतो. कोलकाता जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर बेंगळुरू आणि पुणे यांनी २०२४ मध्ये सरासरी १८ किमी प्रतितास वेगाने १० किमी अंतर कापण्यासाठी ३३ मिनिटे आणि २२ सेकंदांचा प्रवास असल्याने अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान मिळवले. जागतिक स्तरावर कोलंबियामधील बैरेंक्विला हे सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेलं शहर आहे. येथे 10 किमी अंतर कापण्यासाठी 36 मिनिटं 6 सेकंद लागतात. India’s Most Congested City in 2024 |
भारतात इतर गर्दीची शहरे हैदराबाद, चेन्नई आणि मुंबई आहे. या शहरांत १० किमी प्रवासासाठी अनुक्रमे ३२ मिनिटे, ३० मिनिटे आणि २९ मिनिटे सरासरी प्रवास वेळ आहे. हैदराबाद, चेन्नई आणि मुंबई सारख्या शहरांमधील वाहतुकीची स्थितीही चिंताजनक असल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे.
याबाबत टॉमटॉमचे ट्रॅफिक उपाध्यक्ष राल्फ-पीटर शेफर म्हणतात की, वाहतूक कोंडीची मुख्य कारणे जुने रस्ते, अव्यवस्थित शहरी नियोजन आणि शहरीकरणाच्या वाढत्या मागण्या आहेत. उत्तम रस्ते पायाभूत सुविधा, स्मार्ट वाहतूक व्यवस्थापन प्रणाली आणि सार्वजनिक वाहतुकीचा व्यापक वापर यामुळे ही समस्या बऱ्याच प्रमाणात सोडवली जाऊ शकते, असे अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा:
कॅलिफोर्नियामधील महाभयंकर आगीचे कारण काय? तज्ञांसमोर मोठे आव्हान