‘मुलीवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात रुग्णालयातील अनेकांचा सहभाग…’, पीडितेच्या वडिलांनी सीबीआयकडे दिली संशयितांची नावे

Kolkata Rape-Murder Case । कोलकात्यातील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा सीबीआयने तपास सुरू केला आहे. दरम्यान, या प्रकरणात रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांचा हात असल्याचा आरोप पीडितेच्या पालकांनी केला आहे. या प्रकरणात त्याच महाविद्यालयातील काही इंटर्न आणि डॉक्टरांचा सहभाग असल्याचे पीडितेच्या पालकांनी सांगितलेअसल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
पीडितेच्या वडिलांनी उपस्थित केले हे प्रश्न Kolkata Rape-Murder Case ।
पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांची मुलगी ड्युटीवर असताना सात तास तिला कोणीही बोलावले नाही, ही त्यांच्यासाठी चिंतेची बाब आहे. त्यांनी सांगितले की त्यांची मुलगी ओपीडीमध्ये ड्युटीवर होती, ती सकाळी 8.10 च्या सुमारास घरून निघाली होती आणि रात्री 11.15 च्या सुमारास तिचे आईशी शेवटचे बोलणे झाले. सकाळी तिच्या आईने तिला पुन्हा फोन केला असता तिचा फोन कोणीच उचलला नव्हता. तोपर्यंत माझ्या मुलीचा मृत्यू झाला होता.
ते पुढे म्हणाले, ‘चिंतेची बाब म्हणजे कॉलवर डॉक्टर असूनही पहाटे 3 ते 10 वाजेपर्यंत कोणालाही त्याची गरज नव्हती. माझ्या मुलीच्या निधनानंतर आता कॉलेजचे लोक आमच्यासाठी उभे आहेत, खरं तर माझ्या मुलीला कॉलेजमध्येच अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे संपूर्ण विभागच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे असे त्यांनी म्हटले आहे.
30 जणांची चौकशी केली जाणार Kolkata Rape-Murder Case ।
सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आमचे लक्ष सध्या किमान ३० नावांवर आहे, ज्यांना आम्ही चौकशीसाठी बोलावू. आम्ही त्याची चौकशी सुरू केली आहे. सीबीआयने यापूर्वी रुग्णालयातील कर्मचारी आणि दोन पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींना (पीजीटी) त्या रात्री डॉक्टरांसोबत ड्युटीवर बोलावले होते.





