Kolkata Rape Case: ममता बॅनर्जीं आंदोलनाच्या ठिकाणी गेल्या म्हणाल्या,’मी तुमच्यासोबत मला मुख्यमंत्रीपदात रस नाही’

Kolkata Rape Case । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज कोलकाता बलात्कार आणि खून प्रकरणाच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या कनिष्ठ डॉक्टरांमध्ये पोहोचल्या. यावेळी त्यांनी डॉक्टरांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यासाठी भावनिक साद दिली त्या म्हणाल्या डॉक्टरांसोबत आहेत.
सॉल्ट लेकमधील आरोग्य विभागाच्या बाहेर निषेधाच्या मंचावर पोहोचून ममता बॅनर्जी म्हणाल्या, “वुई वॉन्ट जस्टिस”, “मला तुमच्या (डॉक्टरांच्या) वेदना समजल्या आहेत, म्हणूनच मी तुमच्यासोबत आहे. मला मुख्यमंत्रीपदाची चिंता नाही. मी विद्यार्थीदशेत खूप आंदोलनेही केली आहेत. आम्हाला तुमच्या सुरक्षेची काळजी आहे.”
मी सीबीआयकडून दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करते
“तुम्ही लोक रस्त्यावर असल्याने मलाही रात्री झोप लागली नाही. एक चौकीदार म्हणून मला जागे राहावे लागले आहे. तुम्ही लोक कामावर परतलात, तर तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे वचन मी देते. मी सहानुभूतीपूर्वक विचार करेन आणि दोषींना शिक्षा होईल. मी सीबीआयकडे फाशीची मागणी करते’
पाचव्या दिवशीही आरोग्य विभाग कार्यालयाबाहेर निदर्शने
पाचव्या दिवशी (मुसळधार पाऊस असूनही) सॉल्ट लेकमधील आरोग्य विभागाच्या कार्यालयाबाहेर कनिष्ठ डॉक्टरांचे निदर्शन सुरू असताना ममता बॅनर्जी निषेधाच्या ठिकाणी पोहोचल्या. आज आंदोलक डॉक्टरांपैकी एक अनिकेत महतो यांनी पीटीआयला सांगितले की, “जोपर्यंत मृतांना न्याय मिळत नाही आणि आमच्या इतर मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत पाऊस, उन, भूकंपही आमचे आंदोलन थांबवणार नाही.” आम्ही येथे एका उदात्त हेतूने आलो आहोत आणि ते साध्य करण्यापासून कोणतीही शक्ती आम्हाला रोखू शकणार नाही.’
आरजी कारजवळ 30 सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश वाढवला
दरम्यान, आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या आसपास लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 18 ऑगस्ट रोजी प्रथम प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले होते, तर या आदेशांनुसार, निर्दिष्ट क्षेत्रात पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास बंदी आहे.
काय आहे कोलकाता बलात्कार प्रकरण?
9 ऑगस्ट 2024 रोजी पश्चिम बंगालच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये एका महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह आढळला होता. तिच्यावर बलात्कार करून नंतर तिची हत्या केल्याचा आरोप आहे. तिच्यावर झालेल्या बलात्कार आणि हत्येचा निषेध कनिष्ठ डॉक्टर करत आहेत.
० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ०





