कोलकाता पुन्हा हादरलं.! वसतिगृहात विद्यार्थिनीवर झाला लैंगिक अत्याचार

Kolkata – कोलकातामधील इंडियन इन्स्टिट्युट ओफ मॅनेजमेंट अर्थात आआयएममध्ये एका विद्यार्थिनीवर बलात्काराचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात बिझनेस स्कूलच्या वसतिगृहात विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात, पीडितेच्या एफआयआरच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारची असल्याचे सांगितले जात आहे.
पीडितेने पोलिसांना सांगितले आहे की, पिडीत मुलीला समुपदेशन सत्रात सहभागी होण्यासाठी वसतिगृहात बोलावण्यात आले होते. त्यानंतर, तिला औषध देऊन बेशुद्ध करण्यात आले आणि नंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
आरोपीने पीडितेला धमकी दिली आहे की, जर तिने या घटनेबद्दल कोणालाही काही सांगितले तर तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील. पोलिस तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.





