कोल्हापूर : पावनगडावर सापडला ऐतिहासिक शिवकालीन ठेवा…
Updated On:

कोल्हापूर(प्रतिनिधी) – कोल्हापूरच्या पावनगडावर ऐतिहासिक शिवकालीन ठेवा सापडला आहे. सह्याद्री प्रतिष्ठान, टीम पावनगड या संस्थाना पन्हाळागडाच्या शेजारील गड म्हणजेच पावनगडावर महादेव मंदिरा शेजारी दिशादर्शक फलक लावताना अंदाजे 400 हुन अधिक तोफगोळे सापडले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः पावनगडाची निर्मिती केली होती. आज दिशादर्शक फलक लावत असताना हे तोफेचे गोळे सापडले असून पावनगडावर आणखी हजारो तोफगोळे सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





