Gesture of Sportsmanship : कोहलीने निवृत्त होणाऱ्या बांगलादेशी दिग्गजाला भेट दिली बॅट, Video होतोय व्हायरल…

Kohli gifts special bat to Bangladesh’s Shakib al Hasan – भारतीय क्रिकेट संघाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशला क्लीन स्वीप दिला आहे. दुसरा कसोटी सामना कानपूरमध्ये झाला, जो भारताने सात गडी राखून जिंकला. यानंतर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने स्वाक्षरी केलेली बॅट नुकतेच लवकरच निवृत्त होणाऱ्या बांगलादेश संघाचा अष्टपैलू खेळाडू शाकिब-अल-हसनला भेट म्हणून दिली.
परदेशात शेवटची ही आपली शेवटची कसोटी असल्याचे शाकिबने आधीच जाहीर केले होते. भारताने दुसऱ्या कसोटीमध्ये बांगलादेश संघाला ७ गडी राखून पराभूत केले. यावेळी सर्व खेळाडू मैदानावरून परतत असताना कोहलीने आपली बॅट शाकिबकडे सोपविली. कोहलीने ही अनपेक्षित भेट दिल्याने शाकिबच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
— Drizzyat12Kennyat8 (@45kennyat7PM) October 1, 2024
विजयानंतर भारतीय संघ एकीकडे सेलिब्रेशन करत असताना दुसरीकडे विराट कोहली शाकिबशी मैत्रीपूर्ण संवाद साधताना दिसला. शाकिबने आयपीएलमध्ये देखील दमदार कामगिरी केली असल्याने त्याचे अनेक चाहते भारतात देखील आहेत. त्याने आयपीएलमध्ये 71 लढती खेळल्या असून त्याने कोलकाता नाईट रायडर्स व हैदराबाद सनरायझर्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
IND vs BAN 2nd Test : रविचंद्रन अश्विनने केला नवा विश्वविक्रम, ‘या’ बाबतीत मुरलीधरनची केली बरोबरी..
राजकीय अशांततेत असलेल्या बांगलादेशातून माजी पंतप्रधान शेख हसीना यांची हकालपट्टी करण्यात आली होती. शाकिबविरुद्ध बांगलादेशमध्ये खुनाचा आरोप करण्यात आला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स स्पर्धेनंतर शाकिब आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्त होऊ शकतो. शाकिब सध्या कुटुंबासह अमेरिकेत राहातो.





