Track Fest 2024 Athletics Meet : दीक्षा-अविनाशची लक्षवेधी कामगिरी; नवे भारतीय विक्रम केले प्रस्थापित…

Track Fest 2024 athletics meet in Los Angeles – अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमधील साऊंड रनिंग ट्रॅक फेस्टमध्ये भारतीय ट्रॅक एथलीट के एम दीक्षाने महिलांच्या १५०० मीटरमध्ये तर अविनाश साबळेने पुरुषांच्या ५००० मीटर स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले. २५ वर्षीय दीक्षाने अंतिम फेरीत ४:०४.७८ मध्ये धावून तिसरे स्थान पटकावले. वारंगल येथील राष्ट्रीय खुल्या ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये २०२१ मध्ये हरमिलन बेन्सने ४:०५.३९ या वेळेचा केलेला मागील विक्रम दीक्षाने मोडीत काढला.
२०२३ मध्ये भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर झालेल्या आंतर-राज्य ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात दीक्षाचा मागील वैयक्तिक सर्वोत्तम सेट ४:०६.०७ असा होता. त्यावेळी तिने बेन्सला हरवून सुवर्णपदक जिंकले होते. उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील दीक्षा गेली पाच वर्षे प्रशिक्षक एस के प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली एमपी एथलेटिक्स अकादमीचा भाग आहे.
Rapid And Blitz Chess Tournament, Poland : आर. प्रग्नानंदची कार्लसनवर मात…
याच स्पर्धेत पारुल चौधरीने महिलांच्या ५००० मीटरमध्ये १५:१०.६९ सेकंद धावत पाचवे स्थान पटकावले. पारुल आपल्या राष्ट्रीय विक्रमात सुधारणा करण्यात कमी पडली तर देशबांधव अंकिता १५:२८८८ च्या वेळेसह दहाव्या स्थानावर राहिली.
अविनाश साबळेने पुरुषांच्या ५००० मीटरमध्ये १३:२०:३७ वेळेसह दुसरे स्थान पटकावले आणि त्याच्या नेहमीच्या ३००० मीटर स्टीपलचेस इव्हेंटमध्येही दुसरे स्थान पटकावले. त्याच स्पर्धेत गुलवीर सिंगने १३३१.९५ अशी वेळ नोंदवली. साबळेची 5000 मीटर राष्ट्रीय विक्रमाची वेळ १३:१९.३० अशी आहे. दुसरीकडे, कार्तिक कुमारने पुरुषांच्या १०,००० मीटरमध्ये शेवटची लॅप ६२ सेकंदात पूर्ण केली पण तरिही त्याला दुसरे स्थान मिळू शकले. त्याने हे अंतर २८:०७.६६ असे नोंद केले.





