DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

DC vs GT KL Rahul Scored a century against Gujarat Titans in IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील झाल्यानंतर स्टार फलंदाज केएल राहुल पूर्णपणे बदललेला दिसतोय. तो पूर्वीसारखाच सातत्याने धावा करत आहे, पण आता तो पुन्हा त्याच्या जुन्या शैलीत आक्रमक फलंदाजी करत आहे. अशा फलंदाजीचे त्याला मोठे बक्षीसही मिळाले. त्याने गुजरातविरुद्धच्या सामन्यात सलामीला येत नाबाद वादळी शतक झळकावत इतिहास रचला आहे. ज्यामुळे दिल्लीला १९९ धावांचा भला मोठा डोंगर उभारता आला.
केएल राहुलने झळकावले ऐतिहासिक शतक –
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या हंगामातील ६० व्या सामन्यात राहुलने ६० चेंडूत हे शतक पूर्ण केले. यासह, ३ वर्षांनंतर, राहुलने आयपीएलमध्ये शतक झळकावले आहे. यासह तो तीन वेगवगळ्या संघांसाठी शतक झळकावणारा आयपीएल इतिहासातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याच्या संघातील इतर फलंदाज फक्त लहान डाव खेळू शकले, परंतु राहुल सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत क्रीजवर राहिला आणि त्याने एक संस्मरणीय शतक झळकावले.
💯 reasons why KL Rahul is a big match player 🫡
His majestic ton keeps the momentum running for #DC 💪
Updates ▶ https://t.co/4flJtatmxc #TATAIPL | #DCvGT | @DelhiCapitals | @klrahul pic.twitter.com/VnbvyTZ2Dw
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2025
केएल राहुलचे शतक ठरले खास –
प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीसाठी राहुल सलामीवीर म्हणून मैदानात आला आणि संथ सुरुवातीनंतर त्यांनी धावांचा वेग वाढवला. या फलंदाजाने ३५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतरही त्याची फलंदाजी थांबली नाही आणि राहुलने डावाच्या १९ व्या षटकात आपले शतक पूर्ण केले. राहुलने ६० व्या चेंडूवर चौकार मारून त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील ५ वे शतक पूर्ण केले. येथे पोहोचण्यासाठी राहुलने १२ चौकार आणि ४ षटकार मारले. राहुलच्या शतकातील सर्वात खास गोष्ट म्हणजे तो आयपीएल २०२५ मध्ये शतक झळकावणारा पहिला उजव्या हाताचा फलंदाज बनला. याआधी, चालू हंगामात झळकावलेली चारही शतके डावखुऱ्या फलंदाजांनी झळकावली होती.
हेही वाचा –RR vs PBKS : बच्चा समझा क्या! अर्शदीपला वैभवशी पंगा घेणं पडलं महागात, तुफान धुलाईचा VIDEO व्हायरल
३ वर्षांनी झळकावलं शतक –
KL 2.0 is here and he is ours 💙❤️pic.twitter.com/7JqraxkEGp
— Delhi Capitals (@DelhiCapitals) May 18, 2025
राहुलने ६५ चेंडूत १४ चौकार आणि ४ षटकारांसह ११२ धावांची नाबाद खेळी केली. या शतकासह राहुलने ३ वर्षांची प्रतीक्षाही संपवली. यापूर्वी, त्याने आयपीएल २०२२ च्या हंगामात लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व करताना २ शतके झळकावली होती. एकूणच, राहुलचे आयपीएल कारकिर्दीतील हे पाचवे शतक आहे. योगायोगाने, शुबमन गिलच्या संघाविरुद्ध शतक झळकावून, राहुलने आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत गिल (४) ला मागे टाकले. राहुल आता या यादीत चौथ्या स्थानावर आला आहे. राहुलच्या पुढे विराट कोहली (८), जोस बटलर (७) आणि ख्रिस गेल (६) आहेत.





