KKR vs SRH : वेंकटेश अय्यरच्या वादळी खेळीच्या जोरावर KKR ने उभारला धावांचा डोंगर, SRH ला दिले तब्बल ‘इतक्या’ धावांचे लक्ष्य

KKR vs SRH Kolkata Knight Riders set Sunrisers Hyderabad a target of 201 runs : आयपीएल २०२५ मधील १५ वा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. या सामन्यात अंगक्रिश रघुवंशी आणि वेंकटेश अय्यर यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) सनरायझर्स हैदराबादसमोर २०१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. हैदराबादकडून मोहम्मद शमी, पॅट कमिन्स, झीशान अन्सारी, हर्षल पटेल आणि कामिंदू मेंडिस यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाताची सुरुवात निराशाजनक झाली. पॉवर प्लेमध्ये संघाचे दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतले. पॅट कमिन्सकडे क्विंटन डी कॉक (१) झिशान अन्सारीने झेलबाद केले. त्यानंतर मोहम्मद शमीने सुनील नरेन (७) ची विकेट्स घेतली. यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेने जबाबदारी स्वीकारली. त्याने अंगकृष रघुवंशीसोबत तिसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली.
रघुवंशी आणि अय्यरने झळकावले अर्धशतक –
This duo 🥹💜🤝pic.twitter.com/GwmW8YfDkf
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 3, 2025
अजिंक्य रहाणेने २७ चेंडूत ३८ धावा काढल्यानंतर बाद झाला तर रघुवंशीने ३२ चेंडूत त्याचे दुसरे अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने पाच चौकार आणि दोन षटकार मारले. यानंतर, वेंकटेश अय्यर कोलकातासाठी संकटमोचक ठरला. त्याने फक्त २५ चेंडूत अर्धशतक झळकावले आणि संघाची धावसंख्या २०० च्या जवळ पोहोचवली. तो उत्तम फॉर्ममध्ये दिसला. उपकर्णधाराने २०६.८९ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि ६० धावा काढल्यानंतर तो बाद झाला.
शेवटच्या ९ चेंडूत कुटल्या तब्बल ३१ धावा –
वेंकटेश अय्यरने फलंदाजीने, विशेषतः शेवटच्या षटकांमध्ये, कहर केला. डावाच्या १९व्या षटकात वेंकटेशने पॅट कमिन्सची चांगलीच धुलाई केला. त्याने कमिन्सच्या षटकाची सुरुवात चौकार आणि षटकार मारून केली. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर वेंकटेश चौकार मारण्यात यशस्वी झाला आणि त्याने चौथा चेंडूही सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. कमिन्सच्या या षटकात व्यंकटेशने १९ धावा काढल्या. शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हर्षल पटेलने त्याला अनिकेत वर्माच्या हाती झेलबाद केले. त्याच वेळी, रिंकू सिंग ३१ धावा काढून नाबाद राहिला तर आंद्रे रसेल एक धाव घेत धावबाद झाला.





