KKR vs SRH : कोलकाताने हैदराबादचा उडवला धुव्वा! अय्यर-अरोरा ठरले विजयाचे शिल्पकार

KKR vs SRH Kolkata Knight Riders beat Sunrisers Hyderabad by 80 runs : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील गतविजेत्या केकेआरने पुन्हा एकदा आयपीएल २०२५ च्या सामन्यात उपविजेत्या एसआरएचला ८० धावांनी पराभूत केले. त्याचबरोबर यंदाच्या हंगामातील आपला दुसरा विजय नोंदवला. या सामन्यात, नाणेफेक गमावल्यानंतर, केकेआर संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ६ गडी गमावून २०० धावा केल्या. केकेआरच्या फलंदाजीत, व्यंकटेश अय्यरने ६० धावांची महत्त्वाची आक्रमक खेळी खेळली. प्रत्युत्तरात, सनरायझर्स हैदराबाद संघ १६.४ षटकांत १२० धावा करून सर्वबाद झाला. केकेआरच्या वैभव अरोराने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले.
केकेआरने हैदराबादला सुरुवातीलाच दिले मोठे धक्के –
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध २०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, सनरायझर्स हैदराबादने डावाच्या पहिल्याच षटकापासून विकेट गमावण्यास सुरुवात केली. डावाच्या सुरुवातीलाच वैभव अरोराने ट्रॅव्हिस हेडला ४ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद केले. अभिषेक शर्माला हर्षित राणाने २ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद केले, तर इशान किशन देखील फक्त २ धावा करून बाद झाला. पहिल्या ६ षटकांत सनरायझर्स हैदराबादला फक्त ३३ धावा करता आल्या आणि त्यांनी तीन विकेटही गमावल्या. नितीश रेड्डी आणि कामेंदू मेंडिस यांनी सनरायझर्स हैदराबादचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण रेड्डी १९ धावा आणि मेंडिसने २७ धावा करुन बाद झाले.
After impressing with the bat and in the field, #KKR 𝙬𝙖𝙡𝙩𝙯𝙚𝙙 their way to a handsome 80-run victory at home 😌💜
Scorecard ▶ https://t.co/jahSPzdeys#TATAIPL | #KKRvSRH | @KKRiders pic.twitter.com/Ne4LJhXNP4
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2025
हेनरिक क्लासेनने एका टोकापासून सनरायझर्स हैदराबादचा डाव पुढे नेला पण दुसऱ्या टोकाकडून सतत विकेट पडणे आणि धावगतीचा वाढता दबाव यामुळे तोही फक्त ३३ धावांची खेळी खेळून बाद झाला. केकेआरकडून, वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती यांनी या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली. दोघांनीही प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या, तर आंद्रे रसेलने २ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा –
वेंकटेश अय्यर आणि अंगक्रिश रघुवंशी यांनी झळकावली अर्धशतक –
सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्धच्या या सामन्यात केकेआरच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, वेंकटेश अय्यर आणि युवा खेळाडू अंगक्रिश रघुवंशी यांची अद्भुत कामगिरी पाहायला मिळाली. ज्यामध्ये वेंकटेशने २९ चेंडूत तीन षटकार आणि ७ चौकारांसह ६० धावांची शानदार खेळी केली. याशिवाय अंगक्रिश रघुवंशीने ५० धावांची शानदार खेळी साकारली. हैदराबादकडून शमी, पॅट कमिन्स, हर्षल पटेल, झीशान अन्सारी आणि कामेंदु मेंडिस यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.





