IPL 2024 : मुंबईचा विक्रम मोडत कोलकाताने रचला इतिहास! ‘असा’ पराक्रम करणारा ठरला पहिला संघ…

KKR & IPL History : आयपीएल 2024 च्या शेवटच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार होता, परंतु पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही. हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. यासह प्लेऑफमधील अव्वल 4 संघही निश्चित झाले. आयपीएल 2024 च्या पॉइंट टेबलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघ पहिल्या स्थानावर आहे. केकेआरचे शेवटचे दोन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. यासह केकेआरने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. असे करणारा तो पहिला संघ ठरला आहे.
केकेआरने केला मोठा विक्रम…
कोलकाता नाईट रायडर्सचे पॉइंट टेबलवर 20 गुण आहेत. इतर कोणत्याही संघाकडे इतके गुण नाहीत. नेट रनरेटच्या बाबतीतही त्याचा संघ खूप पुढे आहे. त्यांनी +1.428 च्या प्रभावी निव्वळ धावगतीने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वोत्तम नेट रन रेट (धावगती) आहे. आत्तापर्यंत, लीग टप्पा संपल्यानंतर कोणत्याही संघाची निव्वळ धावगती इतकी शानदार नव्हती. यापूर्वी, मुंबई इंडियन्स संघाने 2020 चा लीग टप्पा +1.107 च्या निव्वळ धावगतीने पूर्ण केला होता.
आयपीएल इतिहासातील टाॅप-5 सर्वोत्तम नेट रन रेट…
1. कोलकाता नाइट रायडर्स : (NRR : +1.428, IPL 2024)
2. मुंबई इंडियन्स : (NRR : +1.107, IPL 2020)
3. मुंबई इंडियन्स : (NRR : +1.084, IPL 20210)
4. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : (NRR : +1.037, IPL 2015)
5. किंग्ज इलेव्हन पंजाब : ( NRR : +0.968, IPL 2014)
‘हे’ चार संघ प्लेऑफसाठी ठरले पात्र…
कोलकाता नाइट रायझर्स व्यतिरिक्त, आयपीएल 2024 च्या प्लेऑफसाठी पात्र ठरलेल्या चार संघांमध्ये राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांचा समावेश आहे. यंदाच्या मोसमात या चार संघांची कामगिरी चांगलीच झाली. KKR संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबाद संघ दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्स तिसऱ्या तर आरसीबी चौथ्या स्थानावर आहे.आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे. पहिला क्वालिफायर सामना कोलकाता नाईट रायझर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे.





