IPL Auction 2026 : मथीशा पथिरानाने रचला इतिहास! IPL इतिहासातील ठरला सर्वात महागडा श्रीलंकन खेळाडू

KKR buys Matheesha Pathirana for 18 crore for IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना याच्यावर फ्रँचायझींनी मोठी बोली लावली. ‘डेथ ओव्हर्स’मधील अचूक मारा आणि वेगवान गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पथिरानासाठी मोठी चुरस पाहायला मिळाली आणि तो या लिलावातील सर्वात चर्चेचा विषय ठरला. त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाने १८ कोटींची विक्रमी बोली लावत आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले.
मथीशा पथिरानाला लागली १८ कोटींची लॉटरी –
चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाचा अविभाज्य भाग असलेल्या पथिरानाला या लिलावापूर्वी संघाने रिलीज केले होते. मात्र, लिलावात त्याने जबरदस्त पुनरागमन करत इतिहास रचला. आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये मथीशा पथिरानासाठी केकेआर संघाने १८ कोटी रुपयांची बरसात करत आपल्या संघात सामील केले. या मोठ्या किमतीसह तो श्रीलंकेचा आयपीएलमध्ये सर्वाधिक महागडा खेळाडू* ठरला आहे. यापूर्वी, तो सीएसकेकडून १३ कोटी रुपयांच्या किंमतीवर खेळत होता.
दिल्ली आणि लखननौ मागे टाकत कोलकाताने मारली बाजी –
Another big buy for @KKRiders 💜
This time it’s Matheesha Pathirana ⚡️
💰 INR 18 Crore#TATAIPLAuction | #TATAIPL pic.twitter.com/nVi2cqyYW7
— IndianPremierLeague (@IPL) December 16, 2025
मथीशा पथिराना हा कोलकाता नाईट रायडर्स संघाचा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याच्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन (२५.२ कोटी) केकेआरने मोठी रक्क्म मोजून खरेदी केले होते. थिरानासाठी बोली लावण्याची प्रक्रिया सुरू होताच, सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन संघांमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळाली. मात्र, काही काळानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाने बोलीतून माघार घेतली.
हेही वाचा – IPL Auction 2026 : कॅमेरून ग्रीनला २५.२ कोटींची बोली, पण मिळणार फक्त १८ कोटी; BCCI चा ‘हा’ नियम कारणीभूत!
यानंतर दिल्लीने माघार घेताच, आपल्या संघात एका महत्त्वाच्या आणि प्रभावी वेगवान गोलंदाजाची गरज असलेल्या केकेआर संघाने बोली लावायला सुरुवात केली. केकेआरने सातत्याने पॅडल उचलत आकडा वाढवला आणि अखेरपर्यंत माघार घेतली नाही. १७ कोटींच्या पलीकडे किंमत जाताच, लखनौ सुपर जायंट्स संघाने आपल्या पर्सचा विचार करून अखेर माघार घेतली. अखेरीस केकेआरने बाजी मारत मथीशा पथिरानाला १८ कोटी रुपयांच्या मोठ्या रकमेसह आपल्या संघात समाविष्ट केले.





