‘किसी का भाई किसी की जान’ची तुफान कमाई; सलमानने मानले चाहत्यांचे आभार

मुंबई – बॉलिवूडचा दबंग अर्थात सलमान खान ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 21 एप्रिलला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची देखील चांगलीच पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. यानिमित्त सलमान सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.
सलमानने इनस्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सलमानने काळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. यातील त्याचा डॅशिंग लूक अनेकांच्या पसंतीस पडला आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले आहे, “तुमचं प्रेम आणि पाठिंब्यासाठी खूप खूप आभार… तुमचं प्रेम आणि पाठिंब्याचं मला कौतुक वाटत आहे.” सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाने केवळ दोन दिवसांत 40 कोटींची कमाई केली आहे.
दरम्यान, ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाने पहिल्या दिवशी 15.81 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 25.75 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 41.56 कोटींचा गल्ला जमवला आहे. पुढील काही दिवसांत या चित्रपटाला आणखी प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
View this post on Instagram
‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी याचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.





