Nevasa News : वरखेडच्या महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने किर्तन महोत्सव

नेवासा : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या नेवासा तालुक्यातील वरखेड येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात सोमवार दि. २२ सप्टेंबर ते दि२ ऑक्टोबर या कालावधीत शारदीय नवरात्र उत्सव साजरा होत आहे. यानिमित्ताने किर्तन महोत्सवासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी येथे सुरू झाली आहे.
श्री महालक्ष्मी कृपेने सोमवार दि. २२ सप्टेंबर पासून ते गुरूवार दि. २ ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या नवरात्रोत्सव उत्सवात किर्तन महोत्सवासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देवगड गुरूदेवदत्त पिठाचे प्रमुख राष्ट्र संत ह.भ.प. गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या कृपा कृपाशिर्वादाने व देवगड संस्थानचे उत्तराधिकारी ह.भ.प. स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व माळेवाडी येथील ह.भ.प. कृष्णा महाराज हारदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
वरखेड येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या दरबारात होत असलेल्या नवरात्र उत्सवात आई दुपारी १ ते ३ कबीरपंथी भजन,रात्री ६ ते ८ किर्तन दररोज दुपारी १ ते ३ कबीरपंथी भजनी मंडळ वरखेड, रामडोह, जळका आणि पंचक्रोशीतील भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तर नवरात्र उत्सव काळात देवगड संस्थानचे महंत ह. भ .प. गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज हे दर्शनासाठी भेट देणार आहे.
श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात होणाऱ्या किर्तन महोत्सवात सलबतपूर येथील ह. भ. प. मच्छिंद्र महाराज निकम,गणेशवाडी येथील ह. भ. प. अशोक महाराज निरफळ,ढोरसडे येथील ह. भ. प. रामायणाचार्य वैभव महाराज माळवदे, नेवासा येथील ह. भ. प. रामायणाचार्य नंदकिशोर महाराज खरात, पैठण येथील ह. भ. प. योगिताई देवकर, कायगाव येथील ह. भ. प. योगीराज दादा महारान वायसळ, नेवासा येथील ह. भ. प. संगित अलंकार सचिन महाराज पवार, जेऊर येथील ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज तांबे, बीड येथील आवाजाचे जादूगार हभप गणेश महाराज वांगे यांच्या कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहे.
दि. १ ऑक्टोबर रोजी होम होऊन मिरवणूक काढण्यात येणार असून दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते ११ ह.भ.प. कृष्णाजी महाराज हारदे माळेवाडी यांच्या काल्याच्या किर्तनाने व तद्नंतर महाप्रसाद वाटपाने नऊ दिवस चाललेल्या नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आयोजित धार्मिक कार्यक्रमाचा व होणाऱ्या कीर्तनाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन, श्री महालक्ष्मी देवी ट्रस्ट वरखेड व समस्त गांवकरी, वरखेड, माळेवाडी भजनी मंडळी व परिसरातील नवरात्र उपवासासाठी बसलेले सर्व भाविकवृंद यांनी केले आहे.





