Pune : किरीट सोमय्या धक्काबुक्की प्रकरण; दोन पोलीस निलंबित
Updated On:

पुणे – भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरण प्रकरणी शिवाजीनगर ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस नाईक दिलीप गोरे आणि सतीश कुंभार अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ते गोपनीय शाखेत कार्यरत होते.
त्यांच्या निलंबन आदेशात म्हटले आहे, की “शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचेबाबत आक्षेपार्ह विधाने तसेच तक्रार दिल्याने शिवसेना कार्यकर्त्यांकडून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता होती. हे माहिती असताना, आपण त्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रमाचा आराखडा माहिती करुन घेणे आवश्यक होते. पक्ष कार्यकर्ते व मनपा कर्मचारी-अधिकारी व पदाधिकारी, तसेच गोपनीय बातमीदारांच्या संपर्कात राहुन माहिती घेणे आवश्यक होते. मात्र, तसे झालेले नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.’





