“वक्फच्या मालमत्तेचा वापर गरीब मुस्लिमांसाठी का नाही?” ; किरेन रिजिजू यांनी उपस्थित केला सवाल

Kiren Rijiju on Waqf Bill । वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक मांडले. विधेयक सादर होताच विरोधकांनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली. काँग्रेसने आरोप केला की त्यांना विधेयकाच्या प्रती उशिरा मिळाल्या आणि विधेयकाचा आढावा घेण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला नाही. दरम्यान, किरेन रिजिजू यांनी वक्फच्या संपत्तीचा हिशोबच संसदेत मांडत त्यांनी काही सवाल उपस्थित केले.
जगातील सर्वात मोठी वक्फ मालमत्ता भारतात Kiren Rijiju on Waqf Bill ।
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फ सुधारणा विधेयक सभागृहात सादर करत विरोधकांवर निशाणा साधला. तसेच त्यांनी , “जगातील सर्वात मोठी वक्फ मालमत्ता भारतात आहे. असे म्हटले जाते की वक्फ बोर्डाकडे रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रानंतर भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी जमीन आहे, परंतु रेल्वे आणि संरक्षण क्षेत्राची मालमत्ता ही देशाची मालमत्ता आहे, तर वक्फ बोर्डाची मालमत्ता ही खाजगी मालमत्ता आहे. जर वक्फ बोर्डाकडे लाखो एकर जमीन आणि लाखो कोटींची मालमत्ता आहे, तर ती देशातील गरीब मुस्लिमांसाठी का वापरली जात नाही?” असा थेट सवाल यावेळी उपस्थित केला.
२०१३ मध्ये वक्फ विधेयकात केलेल्या बदलांवर सवाल Kiren Rijiju on Waqf Bill ।
वक्फ दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी, २०१३ मध्ये यूपीए सरकारने वक्फ बोर्डाला असे अधिकार दिले की वक्फ बोर्डाच्या आदेशाला कोणत्याही दिवाणी न्यायालयात आव्हान देता येणार नाही. वक्फच्या कोणत्याही आदेशाला आव्हान देता येत नव्हते.” असे ते म्हणाले. पुढे रिजिजू म्हणाले की, “जर यूपीए सरकार सत्तेत असते तर संसद भवन, विमानतळासह किती इमारतींना वक्फ मालमत्ता घोषित केले असते कोणास ठाऊक कारण त्यांच्यावरही दावे केले जात होते. केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले की वक्फ दुरुस्ती विधेयकाद्वारे सरकार धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही; हे विधेयक फक्त मालमत्ता व्यवस्थापनाचा विषय आहे. त्यांनी विरोधकांवर जनतेची दिशाभूल करण्याचा आरोप केला.





