‘रावणाने लक्ष्मण रेखा ओलांडली तेव्हा लंका जळून खाक’ ; ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेपूर्वी किरण रिजिजू यांचा विरोधकांना टोला

Kiren Rijiju Message on Opposition । संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनात आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होणार आहे. मात्र या चर्चेपूर्वी, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आज पाकिस्तानविरुद्ध भारताच्या कारवाईचा संदर्भ देण्यासाठी हिंदू पवित्र ग्रंथ रामायणाचा उल्लेख केला.तसेच हा उल्लेख करताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सोमवारी सोशलवरील एका पोस्टमधून रामायणाचा उल्लेख केला आहे. या पोस्टमध्ये त्या त्यांनी,”जेव्हा रावणाने लक्ष्मण रेखा ओलांडली तेव्हा लंका जळून खाक झाली. जेव्हा पाकिस्तानने भारताने काढलेली लाल रेषा ओलांडली तेव्हा दहशतवादी छावण्यांना आगीचा सामना करावा लागला.” असे म्हटले आहे. Kiren Rijiju Message on Opposition ।
Discussion on #OperationSindoor to begin today…
When Ravan crossed the Laxman Rekha, Lanka burned. When Pakistan crossed the red lines drawn by India, terrorist camps faced the fire!
जब रावण ने लक्ष्मण रेखा पार की, तो लंका जल गई। जब पाकिस्तान ने भारत द्वारा खींची गई लाल रेखा… pic.twitter.com/GHh6MtkzsL— Kiren Rijiju (@KirenRijiju) July 28, 2025
दिल्लीत, केंद्रीय मंत्र्यांनी काँग्रेससह संपूर्ण विरोधकांना भारतीय संसदेत पाकिस्तानची भाषा बोलू नये, ज्यामुळे सैन्याचे मनोबल कमी होईल, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे. याविषयी बोलताना त्यांनी, “ते काँग्रेसला सांगू इच्छितात की संसदेत देशविरोधी गोष्टी बोलू नयेत. त्यांनी भारतीय सैन्याला दुखावणारे काहीही बोलू नये. ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या बदलत्या चेहऱ्याचे प्रतीक आहे.” असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. Kiren Rijiju Message on Opposition ।





