Kiran Rao On Laapata Ladies Film | दिग्दर्शिका किरण रावचा ‘लापता लेडीज’ चित्रपट 1 मार्चला चित्रपटातगृहात रिलीज झाला. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कमाल दाखवण्यात अपयशी ठरला. याबाबत एका मुलाखतीदरम्यान किरण रावने भाष्य केले आहे. हा चित्रपट फ्लॉप होण्याची जबाबदारी तिने स्वत: स्वीकारली आहे. किरण रावने पत्रकार फे डिसुझाला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले की, “‘लापता लेडीज’ आणि ‘धोबी घाट’ चित्रपटाने चांगला परफॉर्मन्स दिलेला नाही. त्यामुळे मला तरी हा एक अपयशी चित्रपट वाटतो. आम्ही १०० कोटींचा बिझनेस केला नाही. फक्त ३० ते ४० कोटींचीच कमाई केलेली आहे. हा चित्रपट न चालण्याला मी स्वतःला जबाबदार मानते.” पुढे ती म्हणाली, “‘धोबी घाट’च्यावेळी मला हे जास्त जाणवले होते, कारण प्रेक्षकांसमोर हा चित्रपट वेगळ्या पद्धतीने आणण्याचे कोणतेही माध्यम त्यावेळी उपलब्ध नव्हते. आता जसे ओटीटीचे माध्यम आहे, त्यावेळी तसे कोणतेही पर्यायी माध्यम नव्हते. मला वाटते हा चित्रपट त्या काळाच्या मानाने वेगळा होता. चित्रपटगृहात तो चित्रपट प्रदर्शित करणे सामान्य नव्हते. मात्र, या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाई केली नाही, हे मला माझे अपयश वाटते.” “मी गेल्या १० वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करते. मी खूप चांगले चित्रपट करेल असंही मला वाटायचं, पण तसं काही झालं नाही. मला असे वाटतं की, जेव्हा क्रिएटिव्ह लोकं कमी वेळेत काहीतरी साध्य करू शकत नाहीत, तेव्हा त्यांना अपयश आल्यासारखे वाटू लागते.” अशी प्रतिक्रिया किरण रावने दिलेली आहे. दरम्यान, किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला असला तरी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला. ‘लापता लेडीज’मध्ये मुख्य भूमिकेत प्रतिभा रंटा, नितांशी गोयल, स्पर्श श्रीवास्तव आणि रवी किशन हे कलाकार होते. हेही वाचा: “अहंकारामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ग्रहण लागले”; सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टींवर टीका