राहुल गांधींच्या वक्तव्याच्या सन्मानार्थ ‘या’ मराठी अभिनेत्याने केलेली पोस्ट चर्चेत

Updated On:

मुंबई : लोकसभेचा निकाल लागल्यानंतर संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी काल केलेल्या वक्तव्यामुळे लोकसभेत बराच गदारोळ झाला. राहुल गांधी यांनी जेव्हा हे वक्तव्य केलं त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील लोकसभेत होते. त्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. या सगळ्या प्रकरणावर आता मराठी अभिनेते किरण माने यांनी पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

किरण माने यांनी पोस्टमध्ये काय म्हंटल?
“तुम्ही सगळ्या हिंदुंचा ठेका घेतला नाही.आम्हीही हिंदु आहोत. आमचा धर्म आम्हाला हिंसा आणि द्वेष शिकवत नाही. तुम्ही सांगता तो धर्म आमचा नाही !” भाजपाच्या खोट्या हिंदुत्वाच्या चिंध्या केल्या काल राहुलजींनी ! संसद हलवून सोडली. ज्याला पप्पू ठरवायला दहा वर्षांत हजारो कोटी रूपये खर्च केले, त्याने एका दिवसांत धर्माच्या नांवावरून भ्रष्टाचाराचा धंदा मांडणार्‍या या दांभिकांच्या अब्रूची लक्तरं करून चव्हाट्यावर आणली. काँग्रेस भाजपासे नहीं डरती और न उसे किसी को डराने देगी ।” अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे.

राहुल गांधी नेमके काय म्हणाले होते?
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर चर्चा केली. यावेळी त्यांनी सर्व धर्मांनी दिलेल्या शिकवणुकीचा उल्लेख केला. यानंतर ते म्हणाले की, जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते 24 तास हिंसा आणि द्वेष पसरवण्याचं काम करतात. तुम्ही लोक अजिबात हिंदू नाही. हिंदू कधीही हिंसा करू शकत नाही, द्वेष आणि भीती कधीही पसरवू शकत नाही. राहुल यांचं हे वक्तव्य ऐकून सत्ताधारी चांगलेच संतापले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : 'मोर्चा रोखू शकता, पण आमची इच्छाशक्ती नाही'; सुटका झाल्यानंतर राहुल गांधींचा इशारा

2026-10-07 22:53:07

Rahul Gandhi : 'मोर्चा रोखू शकता, पण आमची इच्छाशक्ती नाही'; सुटका झाल्यानंतर राहुल गांधींचा इशारा

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Rahul Gandhi : राहुल गांधींना पोलिसांनी उचलून गाडीत कोंबलं; प्रियंका गांधीही रस्त्यावर झोपल्या, काय घडलं दिल्लीत?

2026-10-07 18:49:29

Rahul Gandhi : राहुल गांधींना पोलिसांनी उचलून गाडीत कोंबलं; प्रियंका गांधीही रस्त्यावर झोपल्या, काय घडलं दिल्लीत?

Election Commission: "कोणत्याही राजकीय पक्षाला भेटायला आक्षेप नाही," ; राहुल गांधींच्या आरोपांवर आयोगाकडून स्पष्टीकरण

2026-10-07 13:27:33

Election Commission: "कोणत्याही राजकीय पक्षाला भेटायला आक्षेप नाही," ; राहुल गांधींच्या आरोपांवर आयोगाकडून स्पष्टीकरण

Rahul Gandhi: राहुल-प्रियांका गांधींविरुद्ध दिल्लीत FIR ; आकाशवाणी भवनात घुसखोरी केल्याचा आरोप

2026-10-07 10:47:46

Rahul Gandhi: राहुल-प्रियांका गांधींविरुद्ध दिल्लीत FIR ; आकाशवाणी भवनात घुसखोरी केल्याचा आरोप