किम कार्दाशियनला गणपतीच्या मूर्तीसोबत फोटो काढणे पडले महागात; ट्रोल होताच…

Kim Kardashian Ganesha Idol Photo | हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दाशियन उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळ्यानिमित्त भारतात आली होती. यावेळी ती ट्रेडिशनल लुकमध्ये पाहायला मिळाली. मात्र सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही फोटोमुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.
अंबानींच्या लग्नसोहळ्यात किम कार्दाशियनने प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राच्या ऑफव्हाईट लेहेंगा परिधान केला होता. या लेहेंग्यात तिने एक सुंदर फोटोशूट केलं. हे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले. यातील एका फोटोमध्ये किम कादार्शियन गणपतीच्या मूर्तीचा फोटो प्रॉप म्हणून वापर करताना दिसली.
View this post on Instagram
या फोटोमध्ये किम श्रीगणेशाच्या मूर्तीवर वाकून पोज देत आहे. श्रीगणेशाच्या मूर्तीसोबतचा हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. यानंतर किमने तिच्या इंस्टाग्रामवरील हा फोटो डिलिट केला आहे. Kim Kardashian Ganesha Idol Photo |
यावरून नेटकऱ्यांनी ‘हिला कुणीतरी सांगा श्री गणेशाची मूर्ती आहे, कोणतं प्रॉप नाही, ‘आपण त्या संस्कृतीशी संबंधित नसताना हे अगदी अयोग्य आणि अपमानास्पद आहे’, असे म्हंटले आहे. मात्र हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच यावर स्पष्टीकरण न देता तिने इंस्टाग्रामवरील हा फोटो हटवला आहे.
हेही वाचा:
गळ्यात उपरणं अन् तुळशीमाळ…मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठूरायाची पूजा संपन्न…पहा फोटो





