कातिल अदा….! कान्सच्या रेडकार्पेटवर मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेचा जलवा; सोशल मीडियावर लूकची होतेय चर्चा

Neha Pendse : फ्रान्समध्ये सुरू असलेल्या ७८ व्या कान्स चित्रपट महोत्सवाला अनेक मराठी कलाकरांना हजेरी लावली आहे. नुकतीच मराठी सिने इंडस्ट्रीतील नावाजलेली अभिनेत्री नेहा पेंडसेने देखील कान्सला हजेरी लावली. नेहाची हि पहिलीच कान्सवारी असून कान्सच्या रेड कार्पेटवर तिने धमाकेदार एन्ट्री केली. तिच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले असून तिच्या ग्लॅमरस अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
सोशल मीडियावर नेहाच्या कान्सवारीच्या लूकची बरीच चर्चा होत असून, कान्ससाठी काळ्या रंगाचा वेस्टन गाऊन ड्रेस तिने वेअर केला होता. या लूकमध्ये ती खूपच सौंदर्य दिसत होती. रेड कार्पेवरून वेगवेगळ्या पोज देऊन तिने चाहत्यांचे लक्ष वेधून धरले. नेहाने तिच्या लूकचे फोटो इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत.
View this post on Instagram
तसेच शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती समद्रकिनारी पोझ देताना देखील दिसत आहे. या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्सचा वर्षाव केला आहे. कान्स डेब्यू करताना थोडी मनात धाकधूक तर होती पण टेन्शन न घेता इथल्या गोष्टी छान एन्जॉय करायचा हेच ठरवून मी इकडे आली आहे, असे तिने सांगितले. प्रत्येक कलाकारांसाठी कान्समध्ये जाणं हे एक स्वप्न असत आणि माझ्यासाठी सुद्धा हा क्षण स्वप्नपूर्ती सारखा आहे. मला माझा लूक हा थोडा खास ठेवायचा होता, पण सोबतीने तो कसा उठावदार आणि वेगळा दिसू शकतो याचा देखील मी विचार केला आणि मनीष घरतने हे सत्यात उतरवण्यासाठी माझी मदत केली, असे देखील ती म्हणाली.





