Bollywood News । अभिनेत्री श्वेता तिवारीने ‘कसौटी जिंदगी की’ आणि ‘परवरिश’सह अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. आता अलीकडेच तीने टीव्ही इंडस्ट्री आणि मालिकांमधील ट्विस्ट आणि टर्नबद्दल सांगितलं आहे. टीव्ही इंडस्ट्री कोणत्या प्रकारचे डेली सोप बनवले जात आहेत याबद्दल अभिनेत्रीने तिचे मत शेअर केले. श्वेता तिवारीने ‘कसौटी जिंदगी की’ मधील एक प्रसंग शेअर करताना भारतीय मालिकांमधील अनावश्यक ट्विस्टबद्दल सांगितले. श्वेता म्हणाली,’आमच्याकडे एका आठवड्याचे एपिसोड तयार होते. अचानक, एके दिवशी आम्ही सेटवर पोहोचलो आणि आम्हाला सांगण्यात आले की आम्ही उद्या टेलिकास्टचे शूटिंग करत आहोत. मी म्हटलं, ‘उद्याच्या एपिसोडचं शूटिंग का करतोय? आमच्याकडे आधीच आठवडाभर सर्वकाही तयार नाही का?” “मला सांगण्यात आले की सर्व काही उधळले गेले आहे आणि एकता म्हणाली की अनुराग (कसौटीचा मुख्य पात्र) मरत आहे. मला माझी स्क्रिप्ट देण्यात आली आणि मला कळले की हे सर्व करवा चौथवर आहे आणि मग अचानक अपर्णा अनुरागला मारते. सीरिअरमध्ये हे असे ट्विस्ट आणि टर्न आहेत जे शेवटी दाखवले जातात.” शोचा टीआरपी चांगला नसता तर एकताने काय केले असते, असे श्वेता तिवारीला विचारले असते ती म्हणाली, “हा सगळा टीआरपीचा खेळ आहे, प्रत्येक वेळी एकताला वाटायचे की टीआरपी चांगला नाही, तेव्हा ती म्हणायची की कुणाला तरी मारायला हवे. जेव्हा जेव्हा टीआरपी 32 च्या खाली असेल तेव्हा ती म्हणायची, ‘टीआरपी पडेला, कि कुणाला तरी मारावे लागेल.’ यामुळे टीआरपी वाढतो असं सांगत तिने खुलासा केला.