कार्तिक आर्यनच्या ‘भूल भूलैय्या ३’मध्ये होणार कियारा अडवाणीची एन्ट्री?

Bhool Bhulaiya 3 | कार्तिक आर्यनच्या ‘भूल भूलैय्या ३’ या चित्रपटाची मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. नुकत्याच या चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. कार्तिक आर्यन, विद्या बालनसह अनेक कलाकार मंडळी यात पाहायला मिळणार आहे. यातच आता या चित्रपटात आणखी एका जुन्या भूमिकेची पुन्हा एन्ट्री होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कार्तिक आर्यनने पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत ‘भूल भुलैया 3’ बद्दल चर्चा केली. चित्रपटाचे दोन क्लायमॅक्स खरेच शूट झाले आहेत का, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्याबद्दल बोलताना कार्तिकने सांगितले की, “भूल भूलैय्या ३ चे दोन क्लायमॅक्स होते. त्यापैकी आम्हाला फक्त एका क्लायमॅक्सची स्क्रीप्ट देण्यात आली होती.” Bhool Bhulaiya 3 |
पुढे तो म्हणाला, “स्क्रीप्टमधली शेवटची १५ पानं गायब होती. केवळ आमच्याकडेच नाही तर सिनेमाचे असिस्टंट डायरेक्टर, प्रॉडक्शन डिपार्टमेंट सर्वांकडे अशीच स्क्रीप्ट गेली होती. इतकंच नव्हे तर आम्ही कियारासोबत शूट करत होतो.” असं म्हणताच कार्तिक गडबडला आणि त्याने कियाराचं नाव बदलून विद्या बालनचं नाव घेतलं. त्याच्या या विधानानंतर ‘भूल भूलैय्या ३’मध्ये कियारा अडवाणी दिसणार असल्याची शक्यता आहे. कियाराने कार्तिकसोबत ‘भूल भूलैय्या २’मध्ये काम केलं होतं. Bhool Bhulaiya 3 |
View this post on Instagram
क्लायमॅक्सबद्दल बोलताना कार्तिक आर्यन म्हणाला, “आम्ही २ क्लायमॅक्स शूट केले आहेत. मला एवढेच सांगायचे आहे. हे माझ्यासोबत पहिल्यांदाच घडत होतं की मला खूप गोष्टी लपवायच्या होत्या. हा एक वेगळा चित्रपट आहे आणि मला वाटते भूल भुलैया भाग 3 मध्ये तुम्हा सर्वांसाठी खूप सरप्राईज असतील आणि जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा तुम्हाला त्याचा आनंद मिळेल.
कार्तिक आर्यनशिवाय या चित्रपटात तृप्ती डिमरी, विद्या बालन, माधुरी दीक्षित यांच्या भूमिका आहेत. 1 नोव्हेंबर 2024 रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाची टक्कर रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाशी होणार आहे. Bhool Bhulaiya 3 |
हेही वाचा :





