‘गेम चेंजर’ मधील गाण्यातील लुकमुळे कियारा अडवाणी ट्रोल; नेटकरी म्हणाले ‘सस्ती दीपिका’

Kiara Advani | दक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या आगामी ‘गेम चेंजर’ चित्रपटासाठी चाहते फारच उत्सुक आहेत. नुकतेच या चित्रपटाचे एक नवीन गाणे रिलीज झाले आहे, ज्यामुळे कियाराला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. यातील तिच्या लुकवरून तिला ट्रोल केले जात आहे.
या गाण्याचे शीर्षक ‘जाना हैरान सा’ आहे. या गाण्याचा व्हिज्युअल इफेक्ट आणि कलाकारांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेली दिसत नाही. गाण्यातील एका पोस्टरमध्ये कियारा पांढऱ्या रंगाच्या अप्सराच्या पोशाखात दिसली असून, तिच्या या लूकवर टीका होत आहे. सोशल मीडियावर कियाराला ‘सस्ती दीपिका’ म्हणत अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे.
या गाण्याचे पोस्टर पाहून प्रेक्षकांनी कियाराची तुलना ‘ओम शांती ओम’मधील दीपिका पदुकोणच्या लूकशी केली आहे. दरम्यान, हा चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. याआधी हा चित्रपट 2024 च्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता, परंतु नंतर निर्मात्यांनी तारखेत बदल केला. यानंतर आता हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार आहे. मात्र रिलीजपूर्वी या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहे.
हेही वाचा:
“महाराष्ट्रात 6 महिन्यांत 42 लाख मतदार कसे वाढले? 13 लाख अतिरिक्त मते आली कुठून?”; आव्हाडांचा निवडणूक आयोगाला सवाल





