कियारा अडवाणीने ‘हा’ सिनेमा करण्यास दिला नकार; काय आहे मागचं कारणं?

Kiara Advani | बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि तिचा पती सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच आई-बाबा होणार आहेत. अलीकडेच सोशल मीडियाद्वारे त्यांनी ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. मात्र आता प्रेग्नेंसीमुळे तिने एक मोठा निर्णय घेतला आहे. फरहान अख्तर दिग्दर्शित ‘डॉन 3’ या चित्रपटातून कियारा बाहेर पडणार आहे.
‘डॉन 3’ चित्रपटात रणवीर सिंग आणि कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार होते. मात्र आता कियाराने हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे. तिने काही काळ सिनेमापासून दूर राहत प्रेग्नेंसीवर लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी डॉन 3 साठी नवीन नायिका शोधण्यास सुरवात केली आहे.
हा निर्णय कियारा आणि निर्मात्यांमधील परस्पर संमतीने घेण्यात आला आहे. मात्र अद्याप या वृत्ताला कियारा किंवा निर्मात्यांकडून दुजोरा मिळालेला नाही. सध्या कियारा यश स्टारर ‘टॉक्सिक’ आणि ‘वॉर 2’चे शूटिंग पूर्ण करण्याला प्राधान्य देणार असल्याचेही म्हंटले जात आहे. Kiara Advani |
दरम्यान, कियारा आणि सिद्धार्थने फेब्रुवारी 2023 मध्ये राजस्थानच्या जैसलमेरमध्ये लग्न केले. त्यांचे लग्नादरम्यानचे फोटो तुफान व्हायरल झाले होते. लग्नाच्या दोन वर्षांनंतर कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी 28 फेब्रुवारी रोजी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पालक होणार असल्याची घोषणा केली होती. या जोडप्याने हातात बाळाचे मोजे धरलेले एक फोटो शेअर केला होता आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ‘आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट. लवकरच येत आहे.’ ही खुशखबर ऐकल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. Kiara Advani |
हेही वाचा:





