Kiara Advani : ‘टॉक्सिक’नंतर कियाराच्या हाती आणखी एक चित्रपट; सैफ अली खानसोबत शेअर करणार स्क्रीन?
Kiara Advani : कनिका ढिल्लो सिनेमाचं दिग्दर्शन करणार

Kiara Advani : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या ‘टॉक्सिक’ चित्रपटातील तिच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलर आणि टीझरमध्ये तिचे आणि यशचे बोल्ड सीन दाखवण्यात आले आहेत. यातील यश आणि कियाराच्या ‘तबाही’ गाण्यातील केमिस्ट्रीची तुफान चर्चा रंगली आहे. याचदरम्यान आता कियाराला आणखी एका नव्या चित्रपटाची ऑफर मिळाली आहे.
‘पिंकव्हिला’ रिपोर्टनुसार, सैफ अली खान आणि कियारा अडवाणी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. एका इंटेन्स सुपरनॅचरल सिनेमात दोघे स्क्रीन शेअर करणार आहेत. कनिका ढिल्लो सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. Kiara Advani
यापूर्वी तिने ‘दो पत्ती’, ‘हसीन दिलरुबा’, ‘मनमर्जिया’, ‘डंकी’ आणि ‘रक्षाबंधन’ यांसारख्या चित्रपटांचे लेखन केले आहे. याशिवाय तिने नेटफ्लिक्सवर आलेल्या कृती सनॉनच्या ‘तीन पत्ती’ सिनेमाची निर्मितीही केली होती. आता ती तिच्या पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटाद्वारे धमाका करण्यास तयार आहे.
रिपोर्टनुसार, कनिका आणि तिची टीम या सुपरनॅचरल चित्रपटाची कथा बऱ्याच काळापासून लिहीत आहे. ही कथा सैफ आणि कियाराला डोळ्यांसमोर ठेवूनच लिहिण्यात आली आहे. सैफ आणि कियारा पहिल्यांदाच कनिकाच्या या थ्रिलर चित्रपटासाठी एकत्र येत आहेत. या चित्रपटाची निर्मिती ‘एक्सेल एंटरटेनमेंट’ करणार आहे.
कियारा अडवाणीचे आगामी चित्रपट
कियारा अडवाणी आगामी ‘टॉक्सिक’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यश स्टारर या चित्रपटात हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि नयनतारा यांसारख्या अभिनेत्रीही दिसणार आहेत. हा चित्रपट या २६ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
सैफ अली खानचे आगामी चित्रपट
सैफ अली खानच्या कामाबद्दल बोलायचे तर, तो प्रियदर्शन यांच्या ‘हैवान’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारही प्रमुख भूमिकेत असेल. हा चित्रपट मल्याळम चित्रपट ‘ओप्पम’चा हिंदी रिमेक आहे. याशिवाय तो ‘देवरा पार्ट २’ मध्ये दिसणार असल्याच्या चर्चा आहेत. Kiara Advani
हेही वाचा:
Gold & Silver: सोन्या-चांदीच्या दरात भरघोस वाढ ; खरेदी करण्यापूर्वी एकदा किंमत पहा






