“अमेरिकन नेते दिवसाढवळ्या पैसे घेतात, तर पाकिस्तानी…” ; पाकिस्तानचे संरक्षण मंत्र्यांच्या ‘त्या’ विधानामुळे मोठा वाद

Khwaja Asif। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ हे त्यांच्या विधानांमुळे अनेकदा चर्चेत येतात. यावेळी, त्यांनी पाकिस्तनाच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अमेरिका आणि इस्रायलवर निशाणा साधतसाधला आहे. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी या वाहिनीवरील मुलाखतीत बोलताना, “अमेरिकन नेते उघडपणे इस्रायलकडून लाच घेतात. जर त्यांना लाच घ्यायची असेल तर ते गुप्तपणे नाही तर उघडपणे घेतात.” असे म्हटले आहे. मात्र जेव्हा वृत्तवाहिनीच्या निवेदकाने हे विधान व्हायरल होईल असा इशारा दिला तेव्हा, “ते जाऊ द्या.” असे आसिफ यांनी फक्त उत्तर दिले.
ख्वाजा आसिफ यांनी आरोप केला की, अमेरिकन नोकरशाही आणि संरक्षण अधिकाऱ्यांना इस्रायली लॉबी थेट वित्तपुरवठा करते. अमेरिकन नेते उघडपणे पैसे स्वीकारतात, तर पाकिस्तानी नेत्यांना गुप्तपणे पैसे मिळाल्याबद्दल बदनाम केले जाते. त्यांनी म्हटले की “अमेरिकन व्यवस्था पूर्णपणे पॅरोलवर चालते.”
Bizzare admission, Pakistan’s Defence Minister Khwaja Asif says: “We are being defamed for taking bribes. American politicians accept bribes from Israel openly. If I have to take bribes, I will do it in a backroom somewhere. pic.twitter.com/Yggc8840Fd
— Yeshi Seli (@YeshiSeli) September 17, 2025
पाकिस्तानच्या लॉबिंगबद्दल प्रश्न ? Khwaja Asif।
पाकिस्तान स्वतः अमेरिकन लॉबिंग फर्मवर लाखो रुपये खर्च करत आहे, ख्वाजा आसिफ ज्या इस्रायली लॉबीवर टीका करत होते त्याचप्रमाणे. ट्रम्प प्रशासनापासून, पाकिस्तानने २०२५ च्या पहिल्या आठ महिन्यांत किमान सात लॉबिंग आणि कायदेशीर फर्मशी करार केला आहे. या कंपन्यांचे काळजीपूर्वक प्रोफाइलिंग करण्यात आले आहे, ज्यामध्ये व्हाईट हाऊसचे सध्याचे आणि माजी अधिकारी, आंतरराष्ट्रीय खटले वकील आणि कॅपिटल हिलवरील अनुभवी रणनीतीकार यांचा समावेश आहे. या अहवालातून असे दिसून येते की पाकिस्तान त्याच व्यवस्थेचा भाग आहे ज्यावर त्याचे मंत्री उघडपणे टीका करत आहेत.
अमेरिकेविरुद्ध विधाने Khwaja Asif।
पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अमेरिकेविरुद्ध बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की अमेरिका जगभरात संघर्ष निर्माण करते. ते त्यांची शस्त्रे विकण्यासाठी हे करतात, ज्याचा वापर अमेरिका पैसे कमविण्यासाठी करते. त्यांचा शस्त्र उद्योग प्रचंड आहे आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. अफगाणिस्तान, सीरिया, इजिप्त आणि लिबियासारखे देश, जे एकेकाळी श्रीमंत होते, ते आता युद्धांमुळे गरीब झाले आहेत.





