सोनम कपूरच्या बर्थडे पार्टीत खुशी-वेदांगची जवळीक; हात पकडला अन्…; व्हिडिओ व्हायरल, नेमकं काय घडलं?

Khushi Kapoor | Vedang Raina | गेल्या काही काळापासून अभिनेत्री खुशी कपूरचे नाव वेदांग रैनासोबत जोडले गेले आहे. अशातच आता दोघे एका पाटीच्या निमित्ताने एकत्र आले होते. त्यावेळचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओत खुशी कपूर आणि वेदांग रैना हे एकमेकांशी बोलताना दिसत आहे. व
अभिनेत्री सोनल कपूर हिने सावरिया या चित्रपटातून बॅालीवूडमध्ये पदार्पण केले. ती काल ९ जून रोजी ४० वर्षांची झाली. याचे औचित्य साधत तिच्या धमाकेदार बर्थडे पार्टीचे आयोजन अनिल कपूर यांच्या बंगल्यावर करण्यात आले होते. या पार्टीला बॅालीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. याच पार्टीतला खुशी कपूर आणि वेदांग रैना आले होते. या व्हिडिओत वेदांग रैना खुशीचा हात पकडतो आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram
नेमकं काय व्हिडिओत काय?
या व्हिडिओत पार्टीनंतर बराच वेळी दोघेही एकमेकांशी बोलल्यानंतर खुशी तेथून निघायला निघते. तेव्हा वेदांग तिचा हात पकडतो आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वेंदाग तिला फोनही दाखवत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या व्हिडिओमधील त्यांची कमेस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे.
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. खुशी कपूर आणि वेदांग रैना दोघांनी देखील काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. दोघेही एकत्र खूपच सुंदर दिसत आहेत. ‘द आर्चीज’ या चित्रपटात खुशी कपूर आणि वेदांग रैना यांनी एकत्र काम केले आहे.
हेही वाचा: ‘माझ्या मरणाची चर्चा…’; अमिताभ बच्चन यांचे नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर





