‘माझ्या मरणाची चर्चा…’; अमिताभ बच्चन यांचे नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर

Amitabh Bachchan | बॉलीवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. बिग बी कायम एक्सच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतात. मात्र अनेकदा त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही केले जाते. परंतु ट्रोल करणाऱ्याला अमिताभ बच्चन यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
एका नेटकऱ्याने एक्सवर अभिताभ बच्चन यांच्यासाठी लिहिलं होतं, ‘रात्री शहंशाह जागे का आहेत? झोपा आता तुमचं वय झालं आहे.’ यावर अमिताभ बच्चन म्हणाले, ‘एक दिवस तुझं देखील वय होणार आहे, देवाची इच्छा…’ पण त्यांनी लगेच हे ट्विट डिलिट केलं.
अमिताभ बच्चन यांनी आणखी ट्विट केलं होतं. ‘गॅजेट्स तुटतात, पण वय कायम राहतं…’ यावर एक नेटकरी म्हणाला, ‘वेळेत झोपत जा, नाही तर वय देखील जास्त काळ टिकणार नाही.’ यावर अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला चांगलेच सुनावले आहे.

बिग बी म्हणाले, ‘माझ्या मरणाची चर्चा करण्यासाठी धन्यवाद, देवाची इच्छा…’ हे ट्विट देखील अमिताभ बच्चन यांनी डिलिट केलं. सध्या अमिताभ बच्चन यांच्या ट्विटचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काहींनी बिग बी यांनी दिलेल्या उत्तराचं कौतुक केले, तर अनेकांनी टीका केली आहे. Amitabh Bachchan |
दरम्यान, जगभरात अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज वयाच्या 82 व्या वर्षी देखील ते तेवढयाच उत्साहाने काम करताना दिसतात. Amitabh Bachchan |
हेही वाचा:
खराब हवामानामुळे शुभांशू शुक्लाचे अंतराळ उड्डाण स्थगित ; अॅक्सिओम-४ ची मोहीम आता ११ जूनला





