‘खुशी कपूर’ची इंस्टाग्रामवर दमदार एंट्री

मुंबई – बॉलीवूडमधील दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांची छोटी मुलगी खुशी कपुरने अद्याप चित्रपटसृष्टीत डेब्यू केलेले नाही. परंतु तिच्या लुक्समुळे ती सतत चर्चेत असते. स्वतःला लाइमलाइटपासून दूर ठेवणारी खुशी कपूरने आता आपले इंस्टाग्राम अकाउंट सार्वजनिक केले आहे.
View this post on Instagram
खुशी कपूरलाही मोठी बहिण जान्हवीप्रमाणेच इंस्टाग्रामवर ब्लू टिक मिळाले आहे. खुशीने इंस्टाग्रामवर ऑफिशियली एंट्री केल्यानंतर अन्य कलाकारांनी तिचे अभिनंदन केले आहे. याशिवाय खुशी कपूरने इंस्टाग्रामवर शेअर केलेले फोटोही व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
इंस्टाग्रामवर खुशीला फॉलो करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. 97 हजार 273 फॉलोअर्ससह खुशीने जान्हवीच्या बरोबरीत स्पर्धा कायम ठेवली आहे. तसेच तिचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. खुशी कपूर भलेही चित्रपट इंडस्ट्रीपासून दूर असली तरी तिचे फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे.
View this post on Instagram
खुशी कपूर ही जान्हवीपेक्षा तीन वर्षांनी लहान आहे. खुशीचा जन्म 5 नोव्हेंबर 2000ला झाला आहे. आता 20 वर्षीय खुशी कपूर आपल्या बहिणीप्रमाणेच करिअर करण्यासाठी एकदम तयार असल्याचे दिसून येत आहे. आता ती बॉलीवूडमध्ये कधी डेब्यू करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
View this post on Instagram





