लवकरच बनणार अपारशक्ती खुराना “बाबा’

बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुरानादेखील हळूहळू भाऊ आयुष्मान खुराना प्रमाणेच मनोरंजन विश्वात पाय पसरत आहे. पण मोजक्या भूमिका करूनही अभिनेत्याची फॅन फॉलोव्हिंग जोरदार आहे.
“स्त्री’सारख्या चित्रपटात अभिनेत्याने सहाय्यक भूमिका साकारून सर्वांचे मन जिंकले आहे. अपारशक्तीने नुकतीच एक गोड बातमी आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.
अपारशक्ती खुरानाने नुकताच पत्नी आकृती खुरानाच्या गरोदरपणाची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर करत एक मोनोक्रोम फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आकृती आणि अपारशक्ती लवकरच “आई-बाबा’ होणार आहेत.
अभिनेत्याने एक सुंदर फोटो शेअर करत याची माहिती दिली. या फोटोमध्ये अपारशक्ती पत्नीच्या बेबी बंपला कीस करताना दिसत आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मित आनंददेखील दिसत आहे. फोटोसह अभिनेत्याने एक उत्तम कॅप्शनही लिहिले आहे, जे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
या “स्त्री’ फेम अभिनेत्याने कॅप्शनमध्ये असे लिहिले की, जर लॉकडाऊनमध्ये काम वाढवता आले नाही, तर आम्हाला असे वाटते की निदान कुटुंब तरी वाढवावे. म्हणजेच ही गोड बातमी शेअर करत त्याने लॉकडाऊनमध्ये कुटुंब नियोजन का निवडले,
याचे गमतीदार उत्तर लिहिले आहे. अपारशक्तीच्या या गोड बातमीने प्रत्येकजण आनंदी झाला आहे आणि त्याचे खूप अभिनंदन केले जात आहे.





