खेड : दोंघाना गंभीर जखमी करणाऱ्या तरसाचा मोटारसायकलच्या धडकेत मृत्यू

Updated On:
खेड : दोंघाना गंभीर जखमी करणाऱ्या तरसाचा मोटारसायकलच्या धडकेत मृत्यू

राजगुरुनगर (प्रतिनिधी) : खरपुडी खंडोबा (ता. खेड) येथे काल दि. 5 रोजी तरसाने हल्ला करून दोघा जणांना गंभीर जखमी करून हातापायाचे लचके तोडले आहेत. दरम्यान काही कालावधीत रस्ता ओलांडत असताना मोटारसायकलच्या धडकेत तरसाचा मृत्यू  झाल्याने नागरिकांमधील भीती दूर झाली आहे.

खरपुडी खंडोबा या परिसरात वनपरिक्षेत्र आहे. वनपरिक्षेत्रात मोर, तरस, कोल्हा, लांडगा, बिबट्या याचा मोठा संचार आहे. या परिसरात मागील चार पाच दिवसांपासून तरस या वन्यप्राण्याने धुमाकुळ घालून नागरिकांसह काही जनावरांना चावा घेवून जखमी केले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

काल दि.5 रोजी सकाळी वाकी ( ता खेड ) येथील शेतकरी पांडुरंग सहादू जाधव हे शेताकडे येत असताना तरसाने त्यांच्यावर हल्ला करून हाताला व पायाला चावा घेऊन लचके तोडले. तसेच राहूल गाडे (रा. खरपुडी) हे मोटारसायकलवर जात असताना रस्त्यावर तरस अचानक आडवा आला.

मोटार सायकलची धडक तरसाला बसल्यामुळे राहूल गाडे हे रस्त्यावर पडले. दरम्यान तरसाने गाडे यांच्यावर हल्ला चढवून हाताला चावा घेऊन गंभीर जखमी केले. त्यानंतर काही कालावधीत रस्ता ओलांडत असताना मोटारसायकलची तरसाला जोराची धडक बसल्यामुळे तरसाच्या तोडाला जोराचा मार लागल्यामुळे तरसाचा मूत्यू झाला, असे वनविभागाने सांगितले.

स्थानिक ग्रामस्थांनी जखमीना प्राथमिक उपचारसाठी तात्काळ चाकण येथे दाखल केले. मात्र गंभीर जखमी  असल्याने त्यांना पुणे येथील ससुन रुग्णालयात हलविले आहे. घटना समजताच वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय फापाळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

आणखी संबंधित बातम्या

Khed Crime : मामाचा कोयत्याने खून करून भाच्याने घेतला गळफास; राजगुरुनगर हादरले

2026-09-19 19:02:21

Khed Crime : मामाचा कोयत्याने खून करून भाच्याने घेतला गळफास; राजगुरुनगर हादरले

Fire News : चिंबळी फाट्यावर कंपनीला भीषण आग; साहित्य, यंत्रसामग्री जळून खाक

2026-09-09 19:25:36

Fire News : चिंबळी फाट्यावर कंपनीला भीषण आग; साहित्य, यंत्रसामग्री जळून खाक

Chimbli Tree plantation : चिंबळीत 200 देशी वृक्षांचे रोपण; ‘एक विद्यार्थी, एक झाड’ योजनेची घोषणा

2026-08-24 18:58:33

Chimbli Tree plantation : चिंबळीत 200 देशी वृक्षांचे रोपण; ‘एक विद्यार्थी, एक झाड’ योजनेची घोषणा

Revenue Department : हवेली, खेड प्रांताधिकारी कार्यालयांतील एजंटगिरीच्या तक्रारी; महसूलमंत्र्यांचा कारवाईचा इशारा

2026-08-21 21:41:30

Revenue Department : हवेली, खेड प्रांताधिकारी कार्यालयांतील एजंटगिरीच्या तक्रारी; महसूलमंत्र्यांचा कारवाईचा इशारा

Jejuri News : जेजुरी वारकरी दिंडी अपघाततात सांगली जिल्ह्यातील तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; तीन गावांवर शोककळा

2026-07-13 16:54:14

Jejuri News : जेजुरी वारकरी दिंडी अपघाततात सांगली जिल्ह्यातील तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; तीन गावांवर शोककळा