खेड : तालुक्यात दुपारी तीन पर्यंत १५ व्यक्तींना करोनाची लागण

खराबवाडीतील पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू; तालुक्यातील एकूण संख्या १२७ वर
राजगुरूनगर (प्रतिनिधी) : खेड तालुक्यात जुलै महिन्याच्या पाहिल्याच दिवशी करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या १५ ने वाढली आहे .दुपारी तीन वाजेपर्यंत तब्बल १५ व्यक्तीचा करोना स्वब अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात करोनाचा विळखा वाढत आहे. दरम्यान खरबवाडी येथील पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला असून तालुक्यात मृतांचा आकडा वाढून तो ५ वर पोहचला आहे. तालुक्यातआतापर्यंत तालुक्यातील १२७ रुग्ण संख्या झाली असल्याची माहिती पस सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्याच्या चाकनगरपरिषद वगळून इतर परिसरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे तर राजगुरूनगर नगर परिषद हद्दीतील संख्या वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीजन्य वातावरण निर्माण झाले आहे. आज दि.१ जुलै रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आळंदी पाच, वाकी खुर्द ५, चाकण एक, आळंदी एक,राजगुरूनगर एक, सातकरवाडी एक, चाकणची कान्हेवाडी एक असे १५ जणांना करोनाची लागण झाली आहे. मंगळवारी (दि.३०)रात्री उशिरा २ व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या होत्या त्यामधील राजगुरूनगर येथील एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.त्याच्या अंत्यविधीला मोठा जनसमुदाय उपस्थित होता त्यामुळे अंत्यविधीला उपस्थित असणाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे.
आळंदी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला करोना झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी पाच जणांचे स्वब अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याने आळंदी मध्येही करोनाची दहशत निर्माण झाली आहे. तालुक्यातील करूणाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असून करोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या जवळपास शंभर व्यक्तीच्या स्वब टेस्ट अहवाल येणे बाकी आहेत.
राजगुरूनगर नगर परिषद हद्दीत करोना बाधित संख्या सहावर पोहचली असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे.तर एक नामांकित बँकेच्या अधिकाऱ्याला करोना झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील आळंदी, चाकण आणि शहरातील सर्व व्यवहार सुरु असल्याने बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. भाजीबाजार आणि कपड्यांच्या व सोन्या चांदीच्या दुकानांमध्येही ग्राहकांची संख्या वाढल्याने करोना संसर्गाची भीती वाढत आहे.
तालुक्यात आज दुपारी तीन पर्यंत १२७ रुग्ण संख्या झाली असून त्यापैकी ५१ व्यक्तीनी करोनावर मात केली आहे. ७२ व्यक्ती उपचार घेत आहेत. तर आतपर्यंत ५ व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ग्रामीण मध्ये करोना विषाणू संसर्गात खेड तालुका अव्वल स्थानी आला आहे.





