“सिंधू नदीवर धरण बांधले तर आम्ही हल्ला करू” ; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्याची पुन्हा भारताला धमकी

Khawaja Asif’s threat to India । जम्मूच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढत जात असल्याचे दिसत आहे. त्यातच आता पाकिस्तनविरुद्ध भारताने कडक कारवाई केल्याने तिथल्या मंत्र्यांनी उघडपणे धमकी देण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अलिकडेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी दिली आहे. यावेळी ख्वाजा आसिफ यांनी, “जर भारताने सिंधू नदीवर कोणतेही धरण बांधले तर पाकिस्तान उत्तरादाखल त्यांच्यावर हल्ला करेल” अशी थेट धमकीच त्यांनी दिली आहे. तसेच त्यांनी,”आक्रमकता केवळ गोळ्यांद्वारे केली जात नाही, तर पाणी अडवणे देखील एक हल्ला आहे.” असे म्हणत भारतावर त्यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
ख्वाजा आसिफ यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला अडचणीत आणले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध बिघडले आहेत. १९६० मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झालेला आयडब्ल्यूटी (सिंधू पाणी करार) हा आजपर्यंतचा जगातील सर्वात यशस्वी जल करार मानला जातो. या करारानुसार, भारताला पूर्वेकडील नद्यांवर (रावी, बियास, सतलज) नियंत्रण देण्यात आले, तर पाकिस्तानला पश्चिमेकडील नद्यांवर (सिंधू, झेलम, चिनाब) अधिक अधिकार मिळाले.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताची कडक भूमिका Khawaja Asif’s threat to India ।
काही अटींनुसार पश्चिमेकडील नद्यांवर वीज प्रकल्प आणि इतर बांधकामे करण्याची भारताला मर्यादित परवानगी आहे. भारताने हा करार स्थगित करण्याच्या किंवा एकतर्फी रद्द करण्याच्या शक्यतेवर पाकिस्तानची प्रतिक्रिया तीव्र आणि आक्रमक आहे. २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २६ जणांच्या मृत्यूनंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली. आयडब्ल्यूटी रद्द करण्यासोबतच, भारताने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आणि वाघा-अटारी सीमा बंद केली.
आसिफचे भारताविरुद्धचे हास्यास्पद विधान
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचा असा विश्वास आहे की भारताला आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर अपेक्षित पाठिंबा मिळत नाही. त्यांनी असा आरोप केला की भारताचे आरोप आंतरराष्ट्रीय समुदायाने फेटाळले आहेत. मोदी सरकारकडे त्यांचे दावे सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत.
भारताकडून पाण्याचा शस्त्रासारखा वापर Khawaja Asif’s threat to India ।
ख्वाजा आसिफ यांनी यापूर्वी,”भारत पाण्याचा वापर शस्त्र म्हणून करत आहे, परंतु आम्हाला भारतासोबत युद्ध सुरू करायचे नाही. जर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर पाकिस्तानही त्याला प्रत्युत्तर देईल, असे म्हणाले होते. पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांनी असेही म्हटले होते की, सिंधू पाणी कराराबाबत पाकिस्तान जागतिक बँकेशी संपर्क साधेल.





