अणुबॉम्बची धमकी देणाऱ्या पाकच डोकं आलं ठिकाणावर ; संरक्षणमंत्री म्हणाले,”आम्हाला भारतासोबत युद्ध…”

Khawaja Asif on Pahalgam Attack । पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईने तिळपापड झालेल्या पाकिस्तानने भारताला अणुबॉम्बची धमकी दिली होती. मात्र ही धमकी दोनच दिवसात फोल ठरली आहे. कारण आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर एक हास्यास्पद विधान केले आहे. त्यांनी “आता असे दिसते की भारताने हा हल्ला स्वतःहून केला आहे आणि या हल्ल्यात पाकिस्तानला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.” असे म्हटले आहे. तसेच आपल्याला भारतासोबत कोणत्याही प्रकारचे युद्ध नको असल्याचे म्हटले आहे.
संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पहलगाम हल्ल्याविषयी बोलताना, “आम्हाला भारतासोबत युद्ध सुरू करायचे नाही, पण जर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर पाकिस्तानही त्याला प्रत्युत्तर देईल. भारत पाण्याचा वापर शस्त्र म्हणून करत आहे. सिंधू पाणी कराराबाबत पाकिस्तान जागतिक बँकेशी संपर्क साधेल “असेही त्यांनी सांगितले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला भीती आहे की भारत त्यांच्यावर हल्ला करू शकतो. पाकिस्तानप्रमाणेच भारतालाही सतत इशारा दिला जात आहे.
पहलगाम हल्ल्याची चौकशी रशिया आणि चीनने करावी Khawaja Asif on Pahalgam Attack ।
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीत पाकिस्तान रशिया आणि चीनला सहभागी करून घेऊ इच्छित आहे. एका वृत्तसंस्थेनुसार , “रशियन सरकार चालवणाऱ्या आरआयए नोवोस्ती वृत्तसंस्थेला दिलेल्या अलिकडच्या मुलाखतीत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले, “मला वाटते की रशिया, चीन किंवा अगदी पाश्चात्य देशही या संकटात खूप सकारात्मक भूमिका बजावू शकतात आणि ते एक तपास पथक देखील तयार करू शकतात, ज्याला भारत किंवा मोदी खोटे बोलत आहेत की ते खरे बोलत आहेत याची चौकशी करण्याचे काम सोपवले पाहिजे. आंतरराष्ट्रीय पथकाला हे शोधू द्या.”अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केली ही मागणी Khawaja Asif on Pahalgam Attack ।
ख्वाजा आसिफ म्हणाले की, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही आंतरराष्ट्रीय चौकशीचा प्रस्ताव दिला आहे. वृत्तसंस्थेने ख्वाजा यांना उद्धृत करून म्हटले आहे की, “भारतात, काश्मीरमध्ये या घटनेसाठी कोण जबाबदार आहे आणि हे कोण घडवून आणत आहे ते शोधा. बोलण्यांचा किंवा रिकाम्या विधानांचा काहीही परिणाम होत नाही. पाकिस्तान यात सहभागी आहे किंवा या लोकांना पाकिस्तानचा पाठिंबा होता याचे काही पुरावे असले पाहिजेत? ही फक्त विधाने आहेत, रिकाम्या विधाने आहेत, दुसरे काही नाही.”





