‘यंदा BJP ४०० पार’ काँग्रेस अध्यक्ष खरंच मोदींसमोर ‘असं’ म्हणाले?

400 Paar Ho Raha Hai – लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. देशातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. सत्ताधारी भाजपने देखील बहुमतासह पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
निवडणुकांसाठी भाजपतर्फे ‘अबकी बार ४०० पार’ अर्थात यंदा लोकसभेच्या ४०० पेक्षा अधिक जागा जिंकू अशी घोषणा देण्यात येत आहे.
भाजपची हीच निवडणूक घोषणा येत्या निवडणुकांमध्ये सत्यात उतरणार असल्याचं काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी संसदेत मान्य केल्याचा दावा भाजपतर्फे करण्यात येत आहे.
संसदेमध्ये नेमकं काय घडलं? | Kharge says 400 Paar Ho Raha Hai
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवशेषणादरम्यान खर्गे राज्यसभेमध्ये बोलत होते. भाजपवर निशाणा साधताना त्यांनी ओबीसी महिला आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. केंद्रातील भाजप सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी महिलांच्या आरक्षणाबाबत आलेल्या याचिकेविरोधात प्रतिज्ञापत्र का दिलं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुढं बोलताना खर्गे यांनी, ‘तुमच्याकडे बहुमत आहे. आधी तुमचे ३३० – ३३४ आहेत, आता तर ४०० पार होणार आहे’ अशी खोचक टिपणी केली.
खर्गे यांनी ४०० पार म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. सत्ताधारी बाकावरील खासदार बेंच वाजवू लागले. सदनामध्ये उपस्थित असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील यावर हसू लागले.
PM Modi be like, “I need new haters, the old ones have become my fans…” pic.twitter.com/dnpc5e0vI9
— BJP (@BJP4India) February 2, 2024
खर्गेंचे उपहासात्मक वक्तव्य पण भाजपला… | Kharge says 400 Paar Ho Raha Hai
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगली आहे. खुद्द काँग्रेस अध्यक्ष खर्गेचं भाजपच्या ४०० हून अधिक जागा निवडून येणार असल्याचं मान्य करत असल्याचा दावा भाजप समर्थक करत आहेत.
काँग्रेस नेते खासदार शक्तीसिंह गोहिल यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
खर्गे यांचे ते वक्तव्य उपहासात्मक होते. ‘तुम्ही ४०० पार म्हणत असता मात्र जनता ठरवते, जनतेने ठरवले तर तुम्हाला १०० जागांवर देखील निवडून येता येणार नाही’ असं खर्गे म्हणत होते मात्र भाजपला एवढंही समजलं नसल्याची टिपणी गोहिल यांनी केली.
#WATCH | Delhi: On Congress president Mallikarjun Kharge’s ‘400 paar ho raha hai’ remark in Lok Sabha, Congress MP Shaktisinh Gohil says, “Kharge ji said that in a sarcastic way. He said that you keep saying ‘400 ke paar’ but people decide this and you will not even cross 100… pic.twitter.com/FJdumKdliB
— ANI (@ANI) February 2, 2024
इतर महत्वाच्या बातम्या
‘वंचित’चा इन्ट्रीलाच धमाका! संजय राऊतांसमोरच प्रकाश आंबेडकर असं काही बोलून गेले…
भुजबळांच्या BJP प्रवेशाचा दमानियांचा दावा; फडणवीसांनी जोडले बारामती कनेक्शन…





