Blood Donation : खराडीत रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 120 हून अधिक रक्तपिशव्या संकलित
Blood Donation : खराडीतील रक्षक नगर फेज २ येथे युवा स्पंदन सोशल फाउंडेशनच्या रक्तदान शिबिरात १२० हून अधिक रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या.

Blood Donation : पुणे शहरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असताना युवा स्पंदन सोशल फाउंडेशन आणि रक्षक नगर फेज २, खराडी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यातून १२० हून अधिक रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या.
अपघात, शस्त्रक्रिया, गंभीर आजार आणि विविध वैद्यकीय उपचारांसाठी रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज असते. ही गरज लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्षक नगर फेज २ मधील रहिवाशांनी मोठ्या संख्येने सहभागी होत रक्तदान केले.
शिबिराच्या आयोजनात मंगेश गायकवाड, मोहन गायकवाड, तेजस लाळे, शिवम आल्हाट, रोहित देशमुख, किरण उबाळे, किरण कुमार हनगाडी आणि ह्रितिक देशमुख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच युवा स्पंदन सोशल फाउंडेशनच्या वतीने टीशा खोल्लम, ईशान कुर्हे, नम्रता घोलप आणि प्रांजल कदम यांनी नियोजन व व्यवस्थापनासाठी मेहनत घेतली.
या उपक्रमातून रक्तदानाबाबत जनजागृती करण्याचा तसेच नागरिकांना नियमित रक्तदानासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे गरजू रुग्णाला मदत मिळू शकते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी फाउंडेशनने सर्व रक्तदाते, रहिवासी, स्वयंसेवक आणि सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचे आभार मानले. भविष्यातही जनहिताचे उपक्रम राबविण्याचा संकल्प फाउंडेशनने व्यक्त केला.





