खामेनींना नरकात टाकलं..! अमेरिकेला दिलेल्या इशाऱ्याची डोनाल्ड ट्रम्पकडून थट्टा

वॉशिंग्टन : इराणचे सर्वोच्च नेते आयोतुल्ला अली खामेनी यांनी अमेरिकेला दिलेल्या इशाऱ्याची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थट्टा केली आहे. खामेनींना अमेरिकेने नरकात टाकले आहे, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली आहे. अमेरिकेने पुन्हा हल्ला करू नये, असे खामेनींनी टिव्ही वरून केलेल्या संबोधनामध्ये अमेरिकेला उद्देशून म्हटले होते.
तसेच अलिकडे १२ दिवस चाललेल्या इराण- इस्रायल दरम्यानच्या युद्धात इराणचा विजय झाल्याचा दावाही खामेनींनी केला होता. या वक्तव्याची ट्रम्प यांनी थट्टा केली आहे. पत्रकारांशी बोलताना आणि नंतर सोशल मीडियावरून प्रसिद्ध केलेल्या मोठ्या निवेदनात त्यांनी आयोत्तुल्ला अली खामेनींच्या वक्तव्यात तथ्य नाही.
हे वक्तव्य इराणच्या सर्वात शक्तिशाली राजकीय आणि धार्मिक व्यक्तीला शोभणारे नाही. खामेनींना नरकात टाकले गेल्याचे म्हटले आहे.
इस्रायलपाठोपाठ अमेरिकेनेही इराणच्या तीन आण्विक केंद्रांवर केलेल्या बॉम्बहल्ल्यामध्ये या प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर ट्रम्प यांनी ही टिप्पणी केली आहे.
ज्याच्यावर श्रद्धा आहे, असे तुम्ही आहात. ज्याच्याबद्दल नितांत आदर असावा, असे तुम्ही आहात. तुम्ही सत्य सांगितले पाहिजे, असे ट्रम्प यांनी खामेनी यांना उद्देशून म्हटले आहे. कालच खामेनी यांनी जनतेला केलेल्या संबोधनात इराणने कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळांना लक्ष्य करून थोबाडात मारल्याचे म्हटले होते. यापुढे इस्रायल किंवा अमेरिकेने इराणवर हल्ले करू नये असा इशाराही दिला होता.
ट्रम्प आणि खामेनी यांनी एकमेकांवरची शेरेबाजी सुरूच ठेवली आहेत. त्यामुळे अमेरिका आणि इराणने केलेल्या हल्ल्यांच्या परिणामांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. तसेच झालेल्या युद्धबंदीच्या भविष्याबद्दलही शंका उपस्थित होते आहे.





