पंजाबातील खलिस्तानवाद्यांना पाकिस्तान व अन्य देशातून निधी – मुख्यमंत्री मान

भावनगर – पंजाबात खलिस्तानवादी अमृतपाल आणि त्यांच्या समर्थकांनी मोठ्या कारवाया सुरू केल्या आहेत. या लोकांना पाकिस्तान व अन्य देशातून निधी मिळत आहे असा दावा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केला आहे.
तथापि ही समस्या हाताळण्यास पंजाब पोलिस समर्थ आहेत. खलिस्तानवाद्यांची संख्या केवळ मूठभर आहे असेही त्यांनी म्हटले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत.
अमृतपालसिंग यांच्या समर्थनार्थ तेथे जमलेल्या सुमारे एक हजार समर्थकांनी खलिस्तानच्या बाजूने घोषणा दिल्या असल्या तरी हे हजार लोक म्हणजे संपुर्ण पंजाब नव्हे असे ते म्हणाले.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/the-able-bodied-in-the-society-should-accept-the-guidance-of-at-least-2-people-deputy-chief-minister-devendra-fadnavis/
पंजाबातील स्थिती तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तपासा असेही त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की, पंजाब अशांत करण्याचे काम पुन्हा सुरू झाले असले तरी आम्ही त्यांचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.





