बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे निधन ; वयाच्या ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Khaleda Zia Death। राजकीय अस्थिरतेच्या काळातून जात असलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे निधन झाले आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) च्या नेत्या खालिदा झिया यांनी ढाका त्याठिकाणच्या एव्हर केअर रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्या ८० वर्षांच्या होत्या आणि काही काळापासून आजारी होत्या.
खालिदा झिया यांच्या नेतृत्वाखालील पक्ष बीएनपीने त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये बीएनपीने,”डॉक्टरांनी त्यांना काही वेळापूर्वी मृत घोषित केले आहे. खालिदा झिया यांनी सकाळी ६ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्या बऱ्याच काळापासून आजारी होत्या आणि ढाका येथील एव्हर केअर रुग्णालयात उपचार घेत होत्या”असे म्हटले आहे.
बीएनपीच्या सोशल मीडिया पोस्टनुसार, “माजी पंतप्रधान खालिदा यांची प्रकृती २९-३० डिसेंबरच्या रात्री बिघडली. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारांसाठी परदेशात नेण्याची तयारी सुरू होती. कतारहून एक विशेष विमान ढाका येथे पोहोचले आणि ढाका विमानतळावर थांबण्यात आले. वैद्यकीय मंडळाने खालिदा झिया यांना ढाका याठिकाणी केअर रुग्णालयातून लंडनला जाण्याची परवानगी दिली नाही.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया अनेक आजारांनी ग्रस्त होत्या. त्यांना मधुमेह, संधिवात, यकृत सिरोसिस आणि हृदयरोगाचा त्रास होता. ८० वर्षीय खालिदा झिया गेल्या काही दिवसांपासून आयसीयूमध्ये होत्या, जिथे त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. काल रात्री त्यांची प्रकृती आणखी बिकट झाली.
एक दिवस आधी नामांकन भरले Khaleda Zia Death।
बांगलादेशमध्ये शेख हसीना सरकार उलथवल्यानंतर, अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले आणि आता नवीन सरकार निवडण्यासाठी निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये खालिदा झिया देखील उमेदवार होत्या. खालिदा यांनी त्यांच्या मृत्यूच्या काही तास आधी २९ डिसेंबर रोजी अर्ज दाखल केला. खालिदा झिया यांनी बोगरा-७ मतदारसंघासाठी अर्ज दाखल केला होता.
खालिदा बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान Khaleda Zia Death।
खालिदा झिया यांच्या नावावर बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा विक्रम आहे. १९९१ मध्ये त्या पहिल्यांदाच पंतप्रधान झाल्या आणि त्यानंतर त्यांनी दोनदा बांगलादेश सरकारचे नेतृत्व केले. बेनझीर भुट्टो यांच्यानंतर, खालिदा झिया या मुस्लिम देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान होणाऱ्या जगातील दुसऱ्या महिला नेत्या आहेत.





