Pimpri | खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन

खालापूर, – खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाळा महाविद्यालयांचे एकत्रित वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या, आंतराष्ट्रीय कबड्डी मार्गदर्शक सिमरत गायकवाड यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.२९) करण्यात आला. आजच्या काळात स्मार्ट टीव्ही, मोबाइल वापरले जातात. परंतु आपले ध्येय स्मार्ट ठेवल्यास चांगला खेळाडू घडू शकतो. त्यामुळे चांगला विरंगुळा जोपासा, यश नक्कीच मिळेल, असे मत उद्घाटक गायकवाड यांनी व्यक्त केले.
जनता विद्यालयाच्या कै. पंत पाटणकर क्रीडा मैदानावर जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, जनता विदयालय प्राथमिक शाळा, जनता विदयालय पूर्व प्राथमिक शाळा, बी.एल. पाटील तंत्रनिकेतन, के.एम.सी.कॉलेज, शिशुमंदीर, गगनगिरी इंटरनँशनल स्कूल आणि विधी महाविद्यालयाचा एकत्रित वार्षिक क्रीडा महोत्सव होणार आहे.
संस्थेचे उपाध्यक्ष अबूबकर जळगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी कार्यवाह किशोर पाटील, संचालक दत्ताजीराव मसुरकर, कैलास गायकवाड, अनंता हाडप, अध्यक्ष जितेश ठक्कर, प्राचार्य प्रशांत माने, भास्कर लांडगे, अध्यक्ष विजय चुरी, मुख्याध्यापिका जान्सी आँगस्टीन, मुख्याध्यापिका समिक्षा ढोके, नरेंद्र शहा, प्राचार्या वर्षा घारे, केविना गायकवाड, पद्माकर गायकवाड यांसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, क्रीडा प्रेमी उपस्थित होते.





