पुणे- खडक पोलिसांनी सराईत वाहनचोरास अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरिची पाच वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. या वाहनांची किंमत 1 लाख 5 हजार इतकी आहे. सुलतान रिझवान शेख(19,रा.गांधीनगर, येरवडा) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार खडक पोलिसांचे पथक वाहन चोरीचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीचा शोध घेत होते. तेव्हा त्यांना ही गाडी सराईत गुन्हेगार सुलतान शेख याने चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यानूसार त्याचा शोध घेतला असता, तो भवानी पेठेतील एका स्वच्छतागृहा बाहेर थांबला असल्याची खबर मिळाली. त्यानूसार त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत पाच चोरीची वाहने हस्तगत करण्यात आली.
ही कारवाई अपर पोलिस आयुक्त डॉ.संजय शिंदे, पोलिस उपायुक्त प्रियांका नारनवरे, सहायक पोलिस आयुक्त गजानन टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, पोलिस निरीक्षक उत्तम चक्रे, सहायक पोलिस निरीक्षक सुशिल बोबडे, पोलिस कर्मचारी अजिज बेग, गणेश सातपुते, अनिकेत बाबर, अमेय रसाळ, सागर केकान, संदिप कांबळे, समीर माळवदकर, राहुल मोरे, रोहन खैरे, योगेश जाधव यांच्या पथकाने केली.