करीना कपूरने प्रभासचा 500 कोटींचा चित्रपट नाकारला?

प्रभासचा ‘द राजा साब’ हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच एप्रिल २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे, ज्याचे शूटिंग जवळपास पूर्ण झाले आहे. यानंतर प्रभासच्या खात्यात अनेक मोठे चित्रपट आहेत. संदीप रेड्डी वंगा यांचा ‘स्पिरिट’, प्रशांत नीलचा ‘सालार 2’, नाग अश्विनचा ‘कल्की 2’ आणि ‘फौजी’ यांचा समावेश आहे. सैफ अली खान आणि करीना कपूर 12 वर्षांनंतर या चित्रपटात एकत्र दिसणार असल्याचे बोलले जात होते. पण आता एक मोठे अपडेट आले आहे.
रिपोर्टनुसा, प्रभासच्या चित्रपटात करीना कपूर खान दिसणार नसल्याची चर्चा आहे करीनाचे नाव यशच्या टॉक्सिक चित्रपटाशी जोडले गेले होते. पण शुटिंगच्या तारखांमुळे ती या चित्रपटात काम करू शकली नाही. करीना कपूर खानने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्याबाबत खुलेपणाने चर्चा केली आहे.
ती म्हणते की, तिला साऊथचे चित्रपट करायचे आहेत, पण त्यासाठी ती भूमिका अशाच प्रकारची असावी ज्याचा तिला शोध आहे. मात्र, ‘स्पिरिट’च्या निर्मात्यांशी त्याची कोणतीही चर्चा झालेली नाही. संदीप रेड्डी वंगा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात करीना कपूर खान आणि सैफ अली खान नकारात्मक भूमिकेत असणार असल्याचे बोलले जात होते.
मात्र करीना कपूरच्या वक्तव्यानंतर या अफवेला पूर्णविराम मिळाला आहे. करीना दक्षिणेतील चित्रपटांच्या शोधात आहे, पण तिला भूमिका साकारण्याची घाई नाही. बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्री बऱ्याच काळापासून दक्षिणेकडे वळत आहेत. कदाचित लवकरच करीना कपूर खानचेही नाव त्यात सामील होईल. करीना कपूर खान अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसणार आहे. दरम्यान, ‘द राजा साब’ आणि ‘फौजी’ नंतर प्रभास या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करणार आहे.





