पुणे जिल्हा | क्रिएटिव्ह अॅकॅडमीतून विद्यार्थ्यांना यशाचा मूलमंत्र

इंदापूर, (प्रतिनिधी) – स्पर्धा परीक्षांविषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये लहानपणापासूनच गोडी निर्माण करण्याचे काम क्रिएटिव्ह अकॅडमीच्या माध्यमातून रघुनाथ बोंगाणे सर करतात.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याचा मूलमंत्र देण्याचे काम अतिशय तळमळीने विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन करतात, तसे विद्यार्थी देखील घडवतात असे आमदार दत्तात्रय सावंत म्हणाले.
क्रिएटिव्ह अकॅडमी इंदापूर आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ गुरुकृपा सांस्कृतिक भवन इंदापूर या ठिकाणी झाल्याची माहिती क्रिएटिव्ह अॅकॅडमीचे अध्यक्ष रघुनाथ बोंगाणे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत उपस्थित होते.
दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे प्रास्ताविक रघुनाथ बोंगाणे यांनी केले. माजी प्राचार्य रयत शिक्षण संस्था भीमराव वनवे, भारत बोराटे, हनुमंत बोंगाणे, नानासाहेब देवकर, माधव शिंदे, लंबाते एन. बी, रघुनाथ बोंगाणे, यांचा सत्कार झाला.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या उपस्थितीत नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षा 2024 आय एम विनर, नवोदय विद्यालय निवड, एनएमएमएस परीक्षा इयत्ता आठवी,
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, मेडल, रोख रक्कम देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 40 मेडल, 50 ट्रॉफी, रोख पारितोषिक रक्कम 9600 रुपये असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. 115 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संतोष हेगडे, रमेश जाधव, गाढवे सर, समीर भाई अत्तार, संतोष जामदार, नानासाहेब देवकर, माधव शिंदे, लंबाते साहेब, महारुद्र कुंभार, साळुंके सर, बोंगाणे मॅडम, आप्पासाहेब यमपुरे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





