हिवरेतील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश

कोरेगाव : आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात विशेष करून भाडळे खोऱ्यात केलेल्या विकास कामांनी प्रभावित होऊन हिवरे येथील पंचायत समितीचे माजी सदस्य स्व. लक्ष्मणराव तात्या खताळ यांच्या गटातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी आ. महेश शिंदे गटात प्रवेश केला.
जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल प्रकाश बर्गे यांच्या कोरेगाव येथील कार्यालयात भाजपच्या राज्य परिषदेच्या सदस्या डॉ. प्रिया शिंदे यांच्या हस्ते या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.
राहूल बर्गे, भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश यादव, प्रगतशील शेतकरी हणमंतराव जगदाळे, होलेवाडीचे सरपंच संतोष जाधव, भाजपचे कोरेगाव शहराध्यक्ष दीपक फाळके यांच्यासह हिवरेचे माजी सरपंच अजित खताळ, सरपंच सुरेखा अजित खताळ यावेळी उपस्थित होत्या.
अमोल लक्ष्मण खताळ, संतोष तात्याबा ठोंबरे, मोहन नारायण शेळके, चंद्रकांत आप्पा खताळ, गणेश निवृत्ती खताळ, रवींद्र विनायक खताळ व गणेश लक्ष्मण खताळ यांनी प्रवेश केला.
त्यांचे आणि त्यांच्या समवेत असलेल्या विकास सोसायटीचे चेअरमन शिवाजी खताळ, माजी चेअरमन दत्तात्रय खताळ, माजी सरपंच सुनील खताळ, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तानाजी बीडे, माजू उपसरपंच सुधीर खताळ, विकास सोसायटीचे संचालक तात्याबा खताळ, गोपीनाथ खताळ, शरद खताळ, दत्तात्रय खताळ, पंढरीनाथ खताळ, नारायण खताळ, संतोष खताळ, मोहन खताळ, यशवंत खताळ यावेळी उपस्थित होते.
डॉ. प्रिया शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले आणि आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून हिवरे गावाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार असल्याचा शब्द दिला.





